शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तोंडवली ग्रामसचिवालय जिल्ह्यामध्ये एक आदर्श ठरेल: विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:21 IST

जनसुविधा योजनेंतर्गत १२ लाख रुपये मंजूर झालेल्या तोंडवली -बावशीच्या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन होत आहे. हे ग्रामसचिवालय जिल्ह्यामध्ये एक आदर्श ग्रामसचिवालय ठरेल. यासाठी लागणारा निधी आपण कमी पडू देणार नसल्याची ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली.

ठळक मुद्देतोंडवली ग्रामसचिवालय जिल्ह्यामध्ये एक आदर्श ठरेल: विनायक राऊततोंडवली -बावशीच्या ग्रामसचिवालयाचे भूमीपूजन

कणकवली : जनसुविधा योजनेंतर्गत १२ लाख रुपये मंजूर झालेल्या तोंडवली -बावशीच्या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन होत आहे. हे ग्रामसचिवालय जिल्ह्यामध्ये एक आदर्श ग्रामसचिवालय ठरेल. यासाठी लागणारा निधी आपण कमी पडू देणार नसल्याची ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली.तोंडवली -बावशीच्या ग्रामसचिवालयाचे भूमीपूजन खासदार विनायक राऊत व जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी खासदार राऊत बोलत होते.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, विधानसभा संघटक सचिन सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शिवसेना कायदेविभाग जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, युवासेना जिल्हासमन्वयक राजू राठोड, युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, उपविभागप्रमुख उत्तम ओटवकर, सरपंच सुप्रिया रांबाडे, उपसरपंच कौस्तुभ नाडकर्णी, माजी सरपंच अनंत बोभाटे, दीपक कांडर, युवासेना उपतालुकाप्रमुख आबू मेस्त्री, सिध्देश राणे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील,ग्रामसेवक सचिन पवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी खासदार राऊत पुढे म्हणाले, तोंडवली बावशी ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सहा सदस्य असून विकासकामांसाठी येथील सरपंच सुप्रिया रांबाडे यांच्या सततच्या पाठपुराव्याने येथील विकासकामांना वेगवेगळ्या योजनेतून निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये बावशी गावठाण रस्ता १० लाख रुपये, बावशी धनगरवाडी नळ योजना पाईप लाईन २. ५ लाख रुपये, बावशी गावठाण बोअरवेल १ लाख रुपये, तोंडवली पावणादेवी रस्ता ७ लाख रुपये, बावशी दलितवस्ती साकव ३० लाख, तोंडवली कुडतरकरवाडी १० लाख रुपये आदी कामे पूर्ण झाली आहेत. या गावाच्या विकासासाठी माझे नेहमीच सहकार्य राहील .असेही खासदार राऊत यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग