शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गच्या उपवनसंरक्षकाकडून उच्च न्यायालयाची दिशाभूल; जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत यांचा आरोप

By अनंत खं.जाधव | Updated: October 4, 2023 18:08 IST

मायनिंग लाॅबीसाठी खोटे प्रतिज्ञापत्र 

सावंतवाडी : सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील 25 पैकी 17 गावातील ग्रामस्थांनी आपल्याला इको सेन्सेटिव्ह नको असा एकदा ठराव देऊनही पुन्हा एकदा नव्याने ठराव घेण्यात आला असून असा ठराव घेणे कायद्यात नसताना वनविभागाने राजकीय दबावा खाली  येऊन ठराव घेतले.व खोटे प्रतिज्ञापत्रात उच्च न्यायालयात दाखल केले आहे.ही सरळ सरळ न्यायालयाची फसवणूक आहे.त्यामुळे या विरोधात आम्ही जनतेत जाऊन दाद मागणार असून न्यायालयाच्या निदर्शनास ही वस्तुस्थिती आणून देणार आहे अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते डाॅ.जयेद्र परुळेकर व सामाजिक कार्यकर्ते संदिप सावंत यांनी दिली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मायनिंग लॉबी सक्रिय होत असल्याचा आरोप केला.सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात असणारा सहयाद्री पट्टा मायनिंपासून वाचविण्यासाठी गेली चौदा वर्षेे आम्ही लढा देत आहोत असे असताना सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक नवकीशोर रेड्डी यांनी उच्य न्यायायलयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बुध्दीभेद करणारी माहीती दिली आहे या मागे काही राजकीय लोंकासह जमिन विक्री करणार्‍या टोळक्याचा हात असण्याची शक्यता आहे असा दावा डॉ परुळेकर यांनी केला आहेउपवनसंरक्षक यांनी प्रतिज्ञापत्रात दोन्ही तालुक्यातील  दोन गावे वगळणारी माहिती न्यायायलयात दिली त्या शिवाय सह्याद्रीच्या पट्यात फक्त दोन गावात पट्टेरी वाघाचे अस्तीत्व दिसले असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला आहे.इकोस 17 गावांनी इकोसेन्सेटिव्ह झोन नको म्हणून समितीला सांगितले त्यामुळे या झोनची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे अशा प्रकारच्या अनेक चूकीच्या गोष्टी त्यांनी प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्या आहेत त्यामुळे या विरोधात आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असून प्रत्येक गावात जावून जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच उपवनसंरक्षक यांनी न्यायायलयाची दिशाभूल केली असून त्याबाबत ही न्यायायलया ला पुराव्यासहित माहिती देण्यात येणार असे ही परुळेकर व सावंत यांनी सांगितले.

 सिंधुदुर्गच्या जमिनीत सोन्याच्या खाणी दिसल्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात सिंधुदुर्गच्या भू गर्भात सोन्याच्या खाणी असल्याचे म्हटले होते. पण त्यांना माहित नाही आमचा सिंधुदुर्ग सोन्याचा खजिना आहे. तुम्ही किती मायनिंग लाॅबी उतरविण्याची भाषा केली तरी या खजिन्याला अशा प्रकारे हात लावू शकणार नाही अशी टिका ही परुळेकर यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग