शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Sindhudurg: तळवडे ग्रामपंचायतीत अपहार, सामाजिक कार्यकर्ते जाधव यांनी केला गंभीर आरोप 

By अनंत खं.जाधव | Updated: August 17, 2024 17:12 IST

'याप्रकरणी सर्व संबंधितांची मालमत्ता तपासली जावी'

सावंतवाडी : तळवडे ग्रामपंचायतीत ७३ लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा गुन्हा सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला असला तरी, प्रत्यक्षात एक कोटी वीस लाख रुपयांचा अपहार झाला आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांनी मिळून घोटाळा केला आहे. ठेकेदारासह पाच जण नव्हे तर एकूण १४ जणांचा या घोटाळ्यात समावेश आहे असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव यांनी केला. ते शनिवारी  आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शंकर सावंत उपस्थित होते.तळवडे ग्रामपंचायतीत अपहार झाल्या प्रकरणी तळवडे सरपंच, ग्रामसेवक आणि तीन ठेकेदार अशा पाच जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात चौकशी समितीत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे या प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे पाच जण नव्हे तर १४ जणांचा या प्रकरणांमध्ये समावेश आहे. त्यांची नावे गुन्हा दाखल करताना देण्यात आली नाहीत. मात्र आम्ही प्रत्यक्षात कागदपत्रांच्या पुराव्यासह पोलीस निरीक्षक यांना सविस्तर माहिती सादर करून सर्व संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले पोलीस ठाण्यात ७२ लाख ८१ हजार रुपयांच्या अपहार झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र अपहाराचे ऑडिट केले तर ते एक कोटी वीस लाखापर्यंत जाऊ शकते त्यामुळे पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी तसेच २० फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १४ जणांचा समावेश असल्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी यांना दिले. पण गटविकास अधिकारी यांनी लेखापरीक्षणाचे कारण देत गुन्हा दाखल केला नव्हता. आता गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे पोलिसांनी सर्व प्रकरणाचे ऑडिट करावे आणि सर्वसंबंधीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगतमताने हा सारा प्रकार घडला आहे त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही. जनतेच्या करातून एकेक पैसा खर्च झाला आहे तो कुणाच्या खिशात जाण्यासाठी नव्हे तर विकास कामासाठी आहे असे त्यांनी सांगितले.ठेकेदारांनी अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वळवले आहेत त्याबाबत आमच्याकडे पुरावे आहेत, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी सर्व संबंधितांची मालमत्ता तपासली जावी. तसेच वारंवार अपहार करणाऱ्या ग्रामसेवकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही जाधव यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतfraudधोकेबाजी