कणकवली : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वैभव नागेश काळसेकर (वय २३, रा. पेट्रोलपंपासमोर, कणकवली) आणि मिलिंद मधुकर पवार (२५, रा. जानवली) या दोघा युवकांना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.कणकवली नजीकच्या गावातील १७ वर्षीय मुलगी १५ मेपासून घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या भावाने २२ जूनला तिचे अपहरण झाल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांचा शोध सुरू होता. दरम्यान, गुरुवारी ही मुलगी जानवली येथील मिलिंद पवार याच्या घरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जानवलीतून मुलीसह मिलिंद पवार आणि वैभव काळसेकर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात ही मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर तिला फूस लावून मुंबईला नेण्यात आले होते. तसेच या काळात वैभव काळसेकर आणि मिलिंद पवार यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, दोघाही युवकांवर भादंवि कलम ३७६, ३६३, ३२३, ५०४, ५०६ तसेच बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायदा २०१२ चे कलम ४/८/१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. दोघांनाही शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील कोतवाल यांनी २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. याप्रकरणी उपनिरीक्षक संतोष वालावलकर अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)अजूनही काहींचा समावेशअल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या गुन्ह्यात अजून काही युवकांचा समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिस यादृष्टीने या तपास करत असून लवकरच याचे धागेदोरे हाती लागतील असे सुत्रांनी सांगितले.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By admin | Updated: July 18, 2015 00:12 IST