शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा नाही, विधानसभाच लढवणार; दीपक केसरकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:49 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत अपप्रचार केल्याचा दावा

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले, ते खरे नाही. आम्ही काही ग्रामपंचायत या युतीमधून लढवल्या होत्या. त्यामुळे एकही ग्रामपंचायत नाही म्हणणे चुकीचे आहे. मी आमदारकी सोडून खासदारकी लढविणार, असा ही प्रचार केला; पण काहींच्या मनातील हा गोड गैरसमज दूर होण्यासाठीच मी २०२४ची विधानसभाच लढविणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मतदारसंघातील बरीच विकासकामे पूर्ण झाल्याचा दावाही केला.यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, राज्याच्या शिक्षण विभागात केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात बदल होत आहेत. त्यामुळे शिक्षणामध्ये महाराष्ट्र राज्य पुढच्या वर्षी एक नंबरवर असणार आहे. राज्य सरकारकडून लाखांहून अधिक जास्त सरकारी नोकर भरती करण्यात आली. तर राज्यात ६१ हजार शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणल्याचे त्यांनी सांगितले. 

गैरसमज दूर करण्यासाठी आमदारकीच लढवणारमी आमदारकी नाही तर खासदारकी लढवणार, असा प्रचारही काहींकडून करण्यात येत आहे. मात्र, काहींच्या मनातील हा गैरसमज दूर करण्यासाठी मी २०२४ मध्ये आमदारकीच लढवणार आहे. शिवाय पक्षाकडून खासदारकीसाठी या मतदारसंघातून जो कोणी उमेदवार असेल त्याला ५० हजारांचे लीड मिळून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘त्या’ निवृत्त शिक्षकांना मानधन मिळणारविद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये, म्हणून राज्यातील शाळांमध्ये नेमण्यात आलेल्या निवृत्त शिक्षकांना अद्यापही मानधन मिळाले नसल्याबाबत मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले असता, निवृत्त शिक्षकांना तत्काळ मानधन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजबांधवांना टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारमध्ये कोणताही मतभेद नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांशी चर्चा करूनच काही निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. मराठा समाजबांधवांना आरक्षण देताना ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणारे असावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी मराठा बांधवांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारला डाटा मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. सावंतवाडी मतदारसंघांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले. आम्ही गाव पॅनल म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो तर खानोली व मातोंड या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढवण्यात आली. त्यामुळे काही ग्रामपंचायत नाही, असा प्रचार करणे चुकीचे आहे. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर