शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

खनिकर्मला ७ कोटीचा महसूल

By admin | Updated: January 23, 2015 00:47 IST

गौणखनिज उत्खनन बंदी : वाळूचे लिलाव रखडल्याने उद्दिष्टपूर्तीवर परिणाम

रत्नागिरी : गौणखनिज उत्खनन बंदीचा फटका जिल्ह्याच्या महसुलावर झाला आहे. जिल्ह्यातील गौणखनिज वसुलीपोटी शासनाच्या २२ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी केवळ ७ कोटी ८४ लाख (३५.६४ टक्के) एवढीच वसुली झाली आहे. मात्र, खेड तहसील कार्यालयाने उद्दिष्टापेक्षा अधिक मजल मारत १ कोटी ३२ लाख ८१ हजार एवढी (१३३ टक्के) वसुली केली आहे. त्याखालोखाल राजापूरने (७५.३८ टक्के) वसुली केली आहे. चालू आर्थिक वर्षात गौणखनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज शुल्क व भुपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्याला २२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, खेड आणि दापोली उपविभागीय कार्यालयाने डिसेंबरअखेर आपल्या उद्दिष्टांपैकी अनुक्रमे ७७ आणि ५२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. उर्वरित तालुक्यांची वसुली कमी झाली आहे. राजापूर उपविभागीय कार्यालयाची तर केवळ ४.६५ टक्के इतकीच वसुली झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला ६ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत ६५ लाख ९३ हजार रुपये (१०.९९ टक्के) एवढीच वसुली झाली आहे. डिसेंबर २०१४पर्यंत केलेल्या या वसुलीत खेड तहसील कार्यालयाने अव्वल स्थान राखले आहे. सर्वांत कमी वसुली राजापूर तालुक्यातून झाली आहे. डिसेंबर महिन्यात मात्र सर्वच तालुक्यांनी जोर लावलेला दिसून येतो. या एकाच महिन्यात १ कोटी २२ लाख ६९ हजार इतकी वसुली झाली आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांमधील गौणखनिज उत्खननावरील बंदी आधीच उठविण्यात आली आहे. उर्वरित लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या तालुक्यांवरील बंदीही डिसेंबरमध्ये उठविण्यात आली आहे. मात्र, त्याचा परिणामही या विभागाच्या उद्दिष्टपूर्तीवर झाला आहे. वाळूवरील बंदीही २०११ सालापासून कायम आहे. त्यामुळे त्याचे लिलावही थांबले आहेत. परिणामी जिल्हा प्रशासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. यंदाही वाळूचा लिलाव न झाल्याने महसूल कमी मिळाला आहे.असे असले तरी खेड तालुक्याने उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल मिळवला आहे. त्याखालोखाल राजापूर तालुक्यानेही क्रमांक पटकावला आहे. त्यामानाने उर्वरित तालुक्यांमध्ये खनिकर्म विभागाला कमी महसूल प्राप्त झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. (प्रतिनिधी)२२ कोटींचे उद्दीष्ट--खेडमध्ये उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली.लांजा, गुहागर, रत्नागिरी, मंडणगडची वसुलीही कमी.आर्थिक वर्षात गौणखनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज फी व भूपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्याला २२ कोटींचे उद्दिष्ट. दापोली उपविभागीय कार्यालयाने डिसेंबरअखेर अनुक्रमे ७७ आणि ५२ टक्के केली उद्दिष्टपूर्ती.डिसेंबरअखेर केलेली वसुलीउपविभागउद्दिष्टवसुलीखेड१ कोटी७७,०१,०००रत्नागिरीदीड कोटी२४,८२,०००चिपळूणदीड कोटी३५,६८,०००दापोलीदीड कोटी७७,३५,०००राजापूरदीड कोटी६,९७,०००तहसील स्तरमंडणगड१ कोटी२३,५०,०००दापोली१ कोटी३९,९५,०००खेड१ कोटी१,३२,८१,०००चिपळूण१ कोटी४६,५५,०००संगमेश्वर१ कोटी३८,७९,०००गुहागर१ कोटी२०,८३,०००रत्नागिरी१ कोटी२७,६२,०००राजापूर१ कोटी७५,३८,०००लांजा१ कोटी९०,९५,०००जिल्हाधिकारी ६ कोटी६५,९३,०००कार्यालयएकूण२२ कोटी ७,८४,१३,०००