शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेरी माटी, मेरा देश: ऐश्वर्य, भाग्यश्री मांजरेकर सिंधुदुर्गचे दिल्लीत प्रतिनिधित्व करणार

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 27, 2023 15:40 IST

मालवण : युवा कार्यक्रम आणि केंद्रीय खेल मंत्रालय, नेहरू युवा केंद्राचे मालवण तालुका समन्वयक व व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजचा ...

मालवण : युवा कार्यक्रम आणि केंद्रीय खेल मंत्रालय, नेहरू युवा केंद्राचे मालवण तालुका समन्वयक व व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजचा विद्यार्थी ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर व शिक्षा समागम, दिल्ली जी-२० ची सहभागी भाग्यश्री जनार्दन मांजरेकर यांची दिल्ली येथे आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमात निवड झाली आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे समारोपीय पर्व सुरू असून ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम देशभरात उत्साहात राबविला. या टप्प्यात ‘वसुधा वंदन’, ‘शिलाफलकम्’, ‘पंचप्रण शपथ’, ‘शहीद वीरांच्या कुटुंबीयांचा सन्मान’ असे उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वांना मातृभूमी प्रेमाच्या एकाच धाग्याने जोडणारा ‘अमृत कलश यात्रा’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.जिल्ह्यात ग्रामस्तरावर ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत अमृत कलश यात्रा काढून घरोघरी माती गोळा करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका. सर्व पंचायत समित्या, सर्व ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. दिल्लीत अमृत वाटिका तयार करण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून तब्बल ७ हजार ५०० कलशांमधून माती घेऊन अमृत कलश यात्रा काढण्यात आली.अमृत वाटिका एक भारत- श्रेष्ठ भारत या वाचन बद्धतेचे प्रतीक आहे. शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे कलश घेऊन आल्यावर उपमुख्यमंत्री आणि संसद सदस्यांच्या उपस्थितीत एक भव्य कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर एक नोव्हेंबर रोजी अंतिम सोहळ्याचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले आहे. या अंतिम सोहळ्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व हे येथून ऐश्वर्य मांजरेकर व भाग्यश्री मांजरेकर करणार आहेत. यावेळी नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्गचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी, आई-वडील, मित्रपरिवार व जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग