शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मांगेली-फणसवाडीत पाण्याची समस्या

By admin | Updated: May 10, 2016 02:26 IST

ग्रामस्थांचा सवाल : पाणी योजनेची प्रतिक्षा संपणार कधी? ; प्रशासनाचे दुर्लक्ष

गजानन बोेंद्रे -- साटेली भेडशी  --निसर्गरम्य अशा डोंगर रांगामध्ये आपल्या दुधाळ पाण्याच्या धारांनी देशासह विदेशी पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या धबधब्यामुळे मांगेलीला मोठी ख्याती निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता येथे असणारा पर्यटकांचा ओढा पाहता येथे सर्व सोयी पुरविण्याची गरज आहे. मात्र या सुविधा राहील्या बाजूला पण मांगेली-फणसवाडी येथील ग्रामस्थांना आजही पाण्यासारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वाडीसाठी स्वतंत्र नळपाणी योजना राबवण्याची मागणी प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली असून सध्या या ग्रामस्थांना तळीच्या पाण्यावरच अवलंबून लागत आहे. तर कधी-कधी दूषित पाण्याच्या समस्येलाही तोंड द्यावे लागते. त्यामुळे स्वतंत्र पाणी योजनेसाठी ग्रामस्थांंची प्रतिक्षा संपणार तरी कधी? असा सवाल निर्माण झाला आहे. गोवा राज्याच्या सीमेवरील व महाराष्ट्र राज्याचे गोव्याकडील शेवटचे टोक म्हणून मांगेली गावाची ओळख. पण या गावाची राष्ट्रीय पातळीवरील खरी ओळख झाली ती येथील निसर्गरम्य ठिकाणच्या धबधब्यामुळे. येथे कोसळणारा धबधबा हा दोन धारांमधून कोसळत असल्याने त्याला पर्यटकांची विशेष पसंती लाभली आहे. पण येथे आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात प्रशासनाची दिरंगाई अजूनही कायम आहे. त्यामुळे सुंदर धबधबा, पर्यटकही भरपूर पण सेवा देणारे प्रशासन कमजोर अशी काहीशी अवस्था येथील झाली आहे. जर येथे आवश्यक सोयी सुविधा निर्माण केल्या तर परिसरातील स्थानिकांना नवीन रोजगाराची संधी मिळू शकेल पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांच्या आकांक्षांवर पाणी सोडण्याचे काम केले आहे. हा गाव चार वाड्यांमध्ये विस्तारलेला आहे. देऊळवाडी, फणसवाडी येथील ग्रामस्थांना दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. टंचाईच्या नावाखाली निधी खर्च पडतो. पण प्रत्यक्षात उपाययोजना होत नाही. योजना चोरीला जाण्याचे प्रकार आजही ग्रामीण भागात पहायला मिळतात. वरील दोन्ही वाड्यांवर प्रशासनाकडून अनेकवेळा खर्च करण्यात आला. मग त्या योजना कार्यान्वित का नाहीत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. फणसवाडी येथे एक लहान तळी आहे. या तळीचे पाणी गेली अनेक वर्षे ग्रामस्थ पित आले आहेत. नैसर्गिक झरा असल्याने येथील पाणी कमी होताना दिसत नाही. काही प्रमाणात त्यात गाळही साचला आहे. मे अखेरपर्यंत येथे पाणीटंचाई भासते. पण आजही मांगेली फणसवाडीसाठी स्वतंत्र नळपाणी योजना नसल्याने तळीच्या पाण्यावर त्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. (प्रतिनिधी)