शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन असताना बैठका, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा :संदेश पारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:11 IST

क्वारंटाईन असणाऱ्या कर्मचाऱ्यांने बैठका घेणे हे चुकीचे असून त्याच्यामुळे तालुक्यात संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी तहसीलदार यांच्याजवळ केली आहे.

ठळक मुद्देत्याच्यावर गुन्हा दाखल करावा :संदेश पारकर क्वारंटाईन असताना बैठका, तहसीलदारांचे लक्ष वेधले

कणकवली : क्वारंटाईन असणाऱ्या कर्मचाऱ्यांने बैठका घेणे हे चुकीचे असून त्याच्यामुळे तालुक्यात संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी तहसीलदार यांच्याजवळ केली आहे.हरकुळ बुद्रुक येथील एका संस्थेत कार्यरत असलेल्या क्वारंटाईन कर्मचाऱ्याने अनधिकृतपणे बैठका घेतल्या. या कर्मचाऱ्यांची आई बाधित आहे. तर कर्मचारी स्वत: निगेटिव्ह असला तरीही तो कॅरिअर ठरून त्याच्यापासून इतर कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात बैठकीला बोलावलेल्या कर्मचाऱ्यांची काही चूक नसतानाही वरिष्ठांच्या आदेशानुसार अनधिकृत बैठक घेणाऱ्या त्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे बाकीचे कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत.याबाबत तहसीलदार आर. जे. पवार यांची भेट घेत ही मागणी करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार एस. व्ही. गवस, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ उपस्थित होते. संबंधित कर्मचारी व त्याची आई परजिल्ह्यातून आल्यानंतर त्यांना त्यांच्याच खोलीत क्वारंटाईन करण्यात आले होते. मग त्यांनी बैठका घेतल्याच कशा? असा सवाल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना यावेळी केला.त्याला बैठका घेण्यास कुणी सांगितले, त्याचीही चौकशी करा. आज त्याच्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. अजूनही अनेकजण हायरिस्क संपर्कात आहेत. तालुक्यात यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गSandesh Parkarसंदेश पारकर