शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

"सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक"

By सुधीर राणे | Updated: September 23, 2022 16:10 IST

गद्दार कोण आणि खरा कोण ? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आपल्या कामातून सिद्ध करतील.

कणकवली : सिंधुदुर्गातील आकारी पड, आंबोली- चौकुळ येथील कबुलायतदार प्रश्न, अपूर्ण असलेले टाळंबा, नरडवे धरण प्रकल्प, वनसंज्ञा यासारखे प्रलंबित प्रश्न येत्या दोन वर्षात शिंदे सरकारच्या माध्यमातून आपण सोडवणार आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती माजी खासदार निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली. कणकवली शिंदे गट शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भास्कर राणे, दिलीप घाडीगावकर, दिनेश तेली उपस्थित होते.सुधीर सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्ष आपण काम करीत आहे. त्यावेळी काँग्रेस पक्ष मजबूत केला. त्यानंतर राजीनामा देवून काँग्रेस पक्ष सोडल्यावर सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेत पाठवले. तेव्हा पासून शिवसेनेला प्रत्येक निवडणूकीत मदत केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेच्या त्यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे माझ्याबरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करावा. त्याच जोमाने आपण मिळून जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी भक्कम काम करू असे आवाहनही त्यांनी केले.ते पुढे म्हणाले, गद्दार कोण आणि खरा कोण ? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आपल्या कामातून सिद्ध करतील. जगातले सर्व उद्योग आणण्याची ताकद महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात आहे. एखादा प्रकल्प बाहेर गेला म्हणून फरक पडत नाही. जिकडे फायदा तिकडे उद्योगपती जात असतात. पर्यटन विकास आणि गावागावात उद्योग  निर्माण करण्यावर आमचा भर राहणार आहे. समृद्ध आणि आनंदी गावाचा प्रकल्प सिंधुदुर्गात आम्ही राबवत आहोत यात सर्व लोकांनी सहभागी व्हावे.शिंदे गटात अनेकजण प्रवेश करणारशिंदे गटाच्या कार्यकारीणीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले,  शिंदे गट शिवसेनेत अनेकजण प्रवेश करणार आहेत. लवकरच जिल्ह्याची कार्यकारीणी आम्ही घोषित करणार आहोत. तसेच मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत कणकवली कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचेही  ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना