शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: साहेब खर सांगतो, विद्युत विभागाची कामे झाली नाहीत, उपविभागीय अभियंत्यांनी दिली कबुली; वरिष्ठांची चिडीचूप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:23 IST

सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील विद्युत विभागांच्या वाढत्या तक्रारींबाबत सावंतवाडीत बैठक

सावंतवाडी : साहेब खर सांगतो पण एप्रिल मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे करायची असतात ती कामे झाली नाहीत. त्यामुळेच विजेचे प्रश्न उद्भवले आहेत अशी स्पष्ट कबुली विद्युत विभागाचे दोडामार्ग उपविभागीय अभियंता विशाल हत्तरंगी यांनी देत विद्युत विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामाची त्याच्या समक्ष पोलखोल केली. या अधिकाऱ्यांच्या कबुली जबाबाने विद्युत विभागाचे वरिष्ठ चिडीचूप बसल्याचे दिसून आले.आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील विद्युत विभागांच्या वाढत्या तक्रारींबाबत सावंतवाडीत बैठक घेतली. या बैठकीला प्रांताधिकारी हेमंत निकम, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब आदींसह अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी दोडामार्ग येथील विजेच्या लपडावाबाबत सवाल उपस्थित करण्यात आले. त्यावेळी उप कार्यकारी अभियंता  हंत्तरगी यांनी मे महिन्यात मान्सून पूर्व काम झाली नाहीत ही वस्तूस्थिती आहे. तुमच्याशी खोटं बोलणार नाही अशी कबुली दिली. मात्र, ही काम आता अंतिम टप्प्यात आहेत. कंत्राटदारांच्या टीम कार्यरत आहेत. वाहन, ट्री कटर व इतर सामुग्रीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आडाळीतील वीज वाहिनीचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समस्या तात्काळ सोडवण्याची सुचना केसरकर यांनी दिली.वेंगुर्ले येथील भूमिगत वाहिन्यांच्या पॅनलचा त्रासवेंगुर्ला येथिल भूमिगत वाहिन्यासाठी उभारलेल्या पॅनलचा त्रास नागरिकांना होत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केला. अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्यानं वालावलकर आक्रमक झाले. ट्रान्सफॉर्मरसाठी पैसे मंजूर होऊन ते का पूर्ण होत नाहीत? अधिकाऱ्यांना ग्राऊंडवरची माहिती नाही असेही म्हणाले. यावेळी  केसरकर यांनी मध्यस्थी करत यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.