शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी नगरपरिषदेत मोठा भ्रष्टाचार; बंद प्रकल्पावर कोटयावधीची उधळण, वसंत केसरकरांचा आरोप

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 23, 2023 17:45 IST

ही उधळपट्टी म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे

अनंत जाधव

सावंतवाडी : नगरपालिकेने विविध प्रकल्पांच्या परीक्षण आणि विकासाच्या नावाखाली लाखो रूपयांची उधळपट्टी चालली आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून केवळ ठेकेदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांना पोसण्याचे काम करून नगरपालिका जनतेच्या पैशांची लूट करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.केसरकर यांनी यावेळी माहितीच्या अधिकारात मिळविलेली कागदपत्रे सादर केली. यात काही बंद प्रकल्पांवरही खर्च दाखविण्यात आला आहे. सावंतवाडी पालिकेत सावळागोंधळ गेली कित्येक वर्षे सुरू आहे. नगरपरिषदेची सुधारित नळ योजना लोकवर्गणीअभावी अंमलात येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत ही उधळपट्टी म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. नागरिकांनी यातून गप्प राहावे की आवाज उठवावा, याचा निर्णय घ्यायचा आहे. निवडणूका आल्यानंतर मते विकली जातात. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाला भाग पाडू असे केसरकर यांनी स्पष्ट केले.सावंतवाडी नगरपरिषदेने जिमखाना मैदान व डॉ. स्वार यांच्यासमोरील मैदानाचे परीक्षण करण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे. दर महिन्याला ९० हजारहून अधिक निधी खर्च केला जात आहे. यात कोणते परीक्षण व विकास केला जात आहे, हे अनाकलीय आहे. हेल्थपार्क प्रकल्प बंद असताना लाखो रुपये खर्च केले जात आहेत ही गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. यावेळी दीनानाथ बांदेकर, सोनाप्पा लाखे, प्रसाद आरविंदेकर उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी