शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांपेक्षा ‘मेरीटाईम बोर्ड’ मोठे आहे का?

By admin | Updated: September 5, 2015 23:50 IST

आरोंदावासीयांचा सवाल : गणेश विसर्जनाचा रस्ता खुला करा अन्यथा उपोषण करणार

सावंतवाडी : आम्हाला व्हाईट आर्चिड कंपनीने वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये नाहक गुंतवले असून आरोंदावासीय कंपनीच्या जागेतून जाणार नाहीत. गणेश विसर्जनाचा रस्ता खुला करावा, अन्यथा सनदशीर मार्गाने उपोषणाचा मार्ग पत्करू, असा इशारा आरोंदा सरपंच उमा बुडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या लादलेल्या आदेशांचे पालन गाववासीयांनी करावे. मग मेरीटाईम बोर्डला रस्ता खुला करून देण्याचे आदेश असताना ते का पाळत नाहीत? मुख्यमंत्र्यापेक्षा मेरीटाईम बोर्ड मोठे आहे का, असा प्रश्नही ग्रामस्थांनी केला. आरोंदावासीयांनी गणेश उत्सवाच्या काळात जेटीवर घातलेली भिंत काढून टाकावी, अन्यथा ती आम्ही पाडू, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर येथील उपविभागीय कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच उमा बुडे, उपविभागीय अधिकारी उत्तम चौरे, पोलीस निरीक्षक रणजित देसाई, प्रभारी तहसीलदार बी. बी. जाधव, उपविभागीय अभियंता अनामिका जाधव, बांदा पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे, आरोंदा ग्रामस्थ अशोक देसाई, बाळ आरोंदेकर, विष्णू नाईक, शुभांगी नाईक, बाळ हरमलकर, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी आदी यावेळी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी इनामदार यांनी कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने आरोंदा ग्रामस्थांनी सनसदशीर मार्गाने आपली भूमिका मांडावी. अन्यथा आम्हाला तेथे १४४ कलमाचा वापर करावा लागेल, असा इशारा दिला. मात्र, आरोंदावासीयांच्यावतीने अशोक नाईक यांनी कोणताही अनुचित प्रकार आमच्याकडून होणार नसल्याचे स्पष्ट केले. तर सरपंच उमा बुडे यांनी गणेश उत्सवाच्या काळात कंपनीने घातलेली भिंत काढावी. आम्हाला गणेश विसर्जन करण्यास बराच अडथळा येतो. तसेच बांधकाम विभागाने ग्रामपंचायतला विश्वासात न घेता रस्ता मेरीटाईमकडे कसा वर्ग केला, असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी विचारला. त्यावर प्रांताधिकारी यांनी हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असून ३० मार्च २०१५ ला याबाबत बैठक झाली. त्यात जीआर काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळीच हा रस्ता ग्रामस्थांनी खुला करावा, तेथे गणेश विसर्जन करण्यास द्यावे, अशा अटी घालण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, बांधकाम विभागाने मेरीटाईमकडे रस्ता वर्ग केला, तरीही मेरीटाईम बोर्ड हुकुमशाही पद्धतीने ग्रामस्थांशी वागत असून रस्ता खुला करण्यास सांगूनही ते खुला करीत नाहीत. मग मेरीटाईम विभागाला मुख्यमंत्र्याचे आदेश लागत नाही का, असा सवालही ग्रामस्थांनी केला. पर्यटन विभागाची आरोंदा खाडीतील बोट अन्यत्र का हलवण्यात आली, यावर मेरीटाईम विभागाचे एस. आर. वेंगुर्लेकर यांनी या बोटीला परवानगी घेतली गेली नसल्याने बोट काढण्यात आली. सध्या ती तारकर्ली येथे असल्याचे स्पष्ट केले. आरोंदा येथील गणेश विसर्जनासाठी भिंत खुली करावी, असे आदेश आम्हाला प्राप्त झाले नाहीत. तसेच आयएफसी कोडप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने याबाबतचा सर्व निर्णय वरिष्ठ कार्यालय घेते. त्याबाबत आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार करू, असे स्पष्ट केले. तर ग्रामस्थांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. अन्यथा आपण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)