शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या कामगार धोरणाविरोधात २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा, भारतीय मजदूर संघातर्फे आयोजन

By सुधीर राणे | Updated: November 14, 2022 14:24 IST

कणकवली: सरकारच्या कामगार धोरणाविरोधात भारतीय मजदूर संघातर्फे २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात राज्यातील १ ...

कणकवली: सरकारच्या कामगार धोरणाविरोधात भारतीय मजदूर संघातर्फे २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात राज्यातील १ लाखांहून अधिक कामगार सहभागी होणार आहेत. सरकारला कामगारांच्या प्रश्न व समस्यांबाबत संवदेनशीलपणे लक्ष घालण्यास भाग पाडण्यासाठी, कामगारामध्ये जागरुकता निर्माण करणे हा मजदूर चेतना यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अनिल दुमणे यांनी सांगितले.कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी बापू दडस, कोकण प्रांताचे संघटक हरि चव्हाण, संघाचे कार्याध्यक्ष भगवान साटम, विकास गुरव आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना दुमणे म्हणाले, महाराष्ट्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने हा महामोर्चा काढण्यात येणार आहे . यानिमिताने मजदूर संघाशी संलग्न कामगार व कार्यकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी ६ ते १७ नोव्हेंबर या १२ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मजदूर चेतना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरी किल्ल्यापासून ६ नोव्हेंबरपासून ही यात्रा सुरु झाली आहे. बारा दिवसांच्या कालावधीत  २१ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे. यात्रेच्या निमित्ताने कामगारांच्या सभा, बैठका , मेळावे घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले जाणार आहे. अभियानाचा समारोप बुधवार २१ डिसेंबरला आझाद मैदान, मुंबई येथे महामोर्चाद्वारे होणार आहे.     महाराष्ट्र राज्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये केवळ बांधकाम आणि माथाडी कामगार सोडले तर अन्य कुठल्याही कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा नाही. असंघटित क्षेत्र सामाजिक सुरक्षा कायदा २००८ साली करण्यात आला. त्याची अंमलबजावणी अद्यापही राज्यात झालेली नाही. भारतीय मजदूर संघाच्या ४० वर्षांच्या प्रयत्नातून घरेलू कामगारांचे बोर्ड तयार झाले. मात्र, २०१४ पासून घरेलू कामगारांना कुठलेही लाभ देण्यात आलेले नाहीत. अंगणवाडी व आशासेविकांना मिळणारे मानधन हे देशातील अन्य राज्यापेक्षा कमी आहे या सर्व विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले. मात्र ,अद्यापही सरकारने याकडे गांभिर्याने लक्ष दिलेले नाही.अत्यल्प वेतनात कामगारांचे शोषण केले जात आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या चार लेबर कोड पैकी राज्यातील कामगारांसाठी लाभदायक असलेले वेतन कोड २०१९ आणि सामाजिक सुरक्षा कोड २०२० हे ताड़तीने लागू करण्याची संघाची मागणी आहे. दरम्यान, भारतीय मजदूर संघाच्या महामोर्चात सिंधुदुर्गातून ३००० कामगार सहभागी होणार असल्याचे हरी चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग