रत्नागिरी : रत्नागिरीतील तरुण छायाचित्रकारांनी स्थापन केलेल्या ‘लेन्सआर्ट - रत्नागिरी’ ग्रुपने रत्नागिरीतील पहिला-वहिला फोटोवॉक आयोजित केला होता. प्रमोद महाजन क्रीडासंकुल ते आठवडा बाजार या टप्प्यातल्या घडामोडींना चित्रीत करणाऱ्या या फोटोवॉकमध्ये तब्बल ४८ जणांनी सहभाग घेतला होता. एका ठराविक ठिकाणाचे आणि त्या भागात घडणाऱ्या घडामोंडीचे अनेकांनी एकत्र येऊन केलेले ‘ङ्मिू४ेील्ल३ं३्रङ्मल्ल’ अर्थात चित्ररुप दस्तऐवजीकरण म्हणजे ‘फोटोवॉक’.त्यामुळे शनिवारचा आठवडा बाजार कॅमेऱ्यांच्या गर्दीने गजबजून गेला. बाजारातील विके्रते आणि खरेदीसाठी आलेले नागरिक सर्वजण कुतुहलाने या उपक्रमाकडे पहात होते. सर्व स्पर्धक एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत किंवा एकत्रीत एकच क्षण टिपत आहेत, असा वेगळा क्षण साऱ्यांनी अनुभवला.प्रत्येक स्पर्धकाने तीन फोटो द्यायचे असल्याने, जवळपास १५० फोटो जमा होतील आणि त्यामधून २०१६सालच्या आठवडा बाजाराचं छायाचित्रीकरण कायमस्वरुपी संग्रही राहणार आहे. ह्याच संग्रहाचं रुपांतर प्रदर्शनामध्ये करण्याचा संयोजकांचा मानस आहे. जेणेकरुन सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन मिळेल. दर आठवड्याला दिसणाऱ्या बाजाराचं एक वेगळं दर्शन रत्नागिरीकरांना यामुळे होईल. या उपक्रमासाठी अमित जोशी, सचिन पाथरे, रिद्धी वैद्य, दुर्वांकूर मेस्त्री, आशिष बालगुडे यांनी विशेष सहकार्य केले. (प्रतिनिधी)प्रमोद महाजन क्रीडा संकुल ते आठवडा बाजार फोटोवॉक.स्पर्धेत रत्नागिरीतील ४८ जणांचा सहभाग.नागरिकांसाठी कुतूहल.
रत्नागिरीतील पहिल्याच फोटोवॉकला मॅरेथॉन गर्दी
By admin | Updated: January 11, 2016 00:35 IST