शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चा तीन लाखांवर जाईल

By admin | Updated: October 18, 2016 23:46 IST

सुहास सावंत : जिल्ह्यातील २३ आॅक्टोबरच्या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात

कुडाळ : ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर २३ आॅक्टोबर रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन अंतिम टप्प्यात सुरु असून, ३ लाखांच्या विक्रमी संख्येचा हा मोर्चा निघेल, अशी माहिती या मोर्चाचे संयोजन समितीचे पदाधिकारी अ‍ॅड. सुहास सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली.पत्रकात सावंत यांनी संयोजन समितीच्यावतीने सांगितले की, महाराष्ट्र आणि राज्याबाहेरही मराठा क्रांती मोर्चांना जसा प्रतिसाद लाभत आहे, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक मराठा बांधव सुद्धा या सुवर्ण दिवसाच्या प्रतीक्षेत आहे. गेला महिनाभर दर शनिवारी जिल्हा नियोजन बैठक आणि दर रविवारी तालुकानिहाय नियोजन बैठका सुरू आहेत. या बैठकांतून होणाऱ्या नियोजनातून जिल्हाभर सुरुवातीला विभागीय मेळावे घेण्यात आले. त्यानंतर गाववार बैठकांचे नियोजन करण्यात आले. या आठवड्यात वाडीवार बैठका पूर्ण करून मोर्चात सामील होण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबत विशेष अशा महिला सभा सुद्धा या नियोजनासाठी घेण्यात आल्या. मोर्चातील प्रमुख मागण्या या आरक्षण, इ. बी. सी. सवलत अशा असल्याने भविष्यात विद्यार्थीवर्गाला त्याचा होणारा फायदा लक्षात आल्याने विद्यार्थी वर्ग सजग झाला असून, स्वयंस्फूर्तीने मोर्चाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवकाची भूमिका बजावण्याची तयारी करत आहेत. युवक मंडळी गाड्या-गाड्यांवर भगवे झेंडे फडकावत ठिकठिकाणी रॅली काढून मोर्चाविषयी जनजागृती करत आहेत. मोर्चासाठी जिल्ह्यातून सुमारे पाच हजार स्वयंसेवकांनी कार्यालयाकडे नावनोंदणी केलेली असून, त्यांच्यासाठी प्रशिक्षण व्यवस्था सुरु करण्यात आलेली आहे. १६ आॅक्टोबर रोजी कणकवली-देवगड-वैभववाडी या तालुक्यातील स्वयंसेवकांसाठी मराठा मंडळ सभागृह कणकवली, १८ आॅक्टोबर रोजी सावंतवाडी- दोडामार्ग- वेंगुर्लेसाठी डी. के. टुरिझम सावंतवाडी येथ प्रशिक्षण झाले. १९ आॅक्टोबर रोजी सिंधुदुर्गनगरी शरद कृषी भवन येथे कुडाळ, मालवण तालुक्यातील स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण होणार आहे.जिल्ह्यातील मोर्चात त्यामुळे अपेक्षित अशा ३ लाखांच्या विक्रमी संख्येचा हा मोर्चा निघेल, असा विश्वास संयोजन समितीने व्यक्त केला आहे. मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्ग या नियोजित मोर्चासाठी जिल्ह्यातून येणारी संख्या विचारात घेता जास्तीत जास्त गाड्यांची व्यवस्था गरजेची आहे. जिल्ह्यातील सर्वच गाडी व्यावसायिक मंडळींनी आपल्या गाड्या मोचार्साठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन सुद्धा समितीकडून करण्यात आलेले आहे, असे सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील अंतिम नियोजन बैठक २0 लामराठा क्रांती मोर्चा नियोजनाची अंतिम व्यापक बैठक २० आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शरद कृषी भवन येथे होणार असून, या बैठकीत तालुकानिहाय पार्किंग व्यवस्था, मोर्चासंबंधी सर्व प्रकारच्या व्यवस्थांचे नियोजन पूर्ण करण्यात येणार आहे. शिवाय त्याचे सादरीकरणही करण्यात येणार आहे.इतर धर्म, समाज यांचा पाठिंबाजिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, जैन इतर समाजातील अनेकांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला असून, मोर्चासाठी आपले योगदान जाहीर केलेले आहे. त्या सर्व बांधवांना जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांकडून जाहीर पाठींबा मिळत असल्याने मोर्चाला पाठबळ मिळाले आहे.