शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

माउलीचरणी जनसागर लोटला

By admin | Updated: November 15, 2016 23:23 IST

लाखोंनी घेतले देवीचे दर्शन : सोनुर्ली जत्रोत्सवात गोवा, कर्नाटक, मुंबईतूनही भाविक

तळवडे : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळकोकणातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माउलीच्या दर्शनासाठी मंगळवारी जनसागर लोटला. या जत्रोत्सवास संपूर्ण कोकण, गोवा, कर्नाटकसह मुंबई आणि विविध ठिकाणांहून आलेले हजारो भक्तगण माउलीचरणी नतमस्तक झाले. ग्रामस्थ, देवस्थान कमिटीने प्रशासनाला हाताशी धरून केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे यावर्षी देवीचे दर्शन सुलभ होऊन वाहनांची कोंडीही जाणवली नाही. जत्रोत्सवासाठी जमलेल्या जनसागरामुळे मंंदिराचा पूर्ण परिसर आणि सोनुर्ली गावातून दोन्ही बाजूंनी जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सकाळी देवीच्या पाषाणावर परंपरेप्रमाणे अभिषेक करण्यात आला. शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून सोन्या-चांदीच्या वस्त्रालंकारांनी देवीची मूर्ती सजविण्यात आली. परंपरेनुसार धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दर्शनासाठी भक्तगणांना सोडण्यात आले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी झाली होती. हळूहळू भक्तांची संख्या वाढू लागल्याने नियोजित करण्यात आलेल्या रांगांमधून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण मंदिराभोवती भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिराभोवती व सोनुर्ली गावातून फुललेल्या जनसागरासह मंदिराच्या दोन्ही बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंत विविध वस्तूंची, खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती. दरवर्षी सोनुर्ली देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांची वाहनांची वर्दळ पाहून यावर्षी चारचाकी वाहनांसाठी विशेष वाहनतळ उभारण्यात आला होता. सायंकाळी वाजतगाजत गावकरी आणि मानकऱ्यांसह ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने श्री माउलीची पालखी मंदिराकडे दाखल झाली. यावेळी पालखीत आसनारूढ झालेली देवीची मूर्ती आकर्षण ठरत होती. मळगाव-सोनुर्ली गावचे हे एकच देवस्थान असल्याने दोन्ही गावांतील भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भक्तगणांकरिता सोनुर्ली माउली देवस्थान कमिटी व सोनुर्ली माउली भक्तगण मित्रमंडळातर्फे खास पाण्याची व मंडपाची व्यवस्था करण्यात आली. आरोग्य विभाग, वीज वितरणचे कर्मचारी, बांधकाम विभाग कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. एस. टी. महामंडळाने यावर्षी श्री देवी सोनुर्ली माउली भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याकरिता नियोजनबद्धरीत्या एसटी गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. यासाठी सोनुर्ली माउली देवस्थान कमिटी व माउली मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी) रात्री लोटांगणांनी नवस फेडणार सोनुर्ली जत्रोत्सव हा लोटांगणासाठी प्रसिद्ध आहे. जत्रोत्सवादिवशी रात्री दहा वाजता भाविक लोटांगणे घालून नवस फेडतात. यावर्षी हजारो भाविक लोटांगण घालण्यासाठी सज्ज झाले असून, हा सोहळा पाहण्यासाठी रात्री भाविकांची गर्दी होणार आहे.