शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आंबा विक्रेत्यांना हटविले, सावंतवाडी नगरपरिषदेकडून कारवाई

By अनंत खं.जाधव | Updated: June 8, 2024 17:59 IST

पालकमंत्र्याची मुदत राहिली बाजूला : व्यापाऱ्यांकडून नाराजीचा सूर 

सावंतवाडी : भाजी मार्केटमध्ये आणि रस्त्यावर अशा दोन्ही ठिकाणी स्टॉल घालून बसणार्‍या विक्रेत्यांना आणखी दहा दिवसांची मुदत वाढवून देण्याबाबत एकमत झाले असतनाच अचानक शनिवारी सावंतवाडी पालिकेने कारवाईचा बडगा उचलल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्काच बसला.आंब्याच्या हंगामात बाहेर बसण्यात परवानगी देण्यात आली होती, परंतु मुदत वाढवून देऊन सुद्धा पुन्हा व्यापारी ठाम राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे म्हणणे आहे. तर पालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत व्यापार्‍यांत नाराजी असून आंबा हंगाम संपेपर्यंत किंवा वटपौर्णिमेनिमित्त तरी बाहेर बसण्याची परवानगी द्या, अशी मागणीव्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील मुख्य रस्त्यावर आंबा विक्रेत्यांना बसण्यास नगरपरिषदने परवानगी दिली होती. मुदत संपल्यानंतर त्यांना उठण्यास सांगितले. पण वटपौर्णिमेपर्यत मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार दोनदा मुदत वाढवून देण्यात आली होती. तर गुरूवारी या विक्रेत्यांना उठण्यास सांगितले. पण ते ऐकत नव्हते शेवटी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना सांगून ही कारवाई टाळली होती.पण मुदत वाढवून देण्या बाबत कोणतेही लेखी आदेश नसल्याने तसेच मुदत वाढीच्या कोणत्याही सूचना आल्या नसल्याने शनिवारी मुख्याधिकाऱ्यांनी स्टॉल खाली करून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. रस्त्यावर व्यापारासाठी बसणार्‍या सर्व व्यापाऱ्यांचे मार्केटमधील स्टॉल हटवणार आहोत, असे नगरपरिषदेच्या अधिकारी रचना कोरगावकर यांनी सांगितले.यावेळी काही व्यापाऱ्यांकडून याला विरोध करण्यात आला, मात्र पालिका कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मार्केटमधील स्टॉल हटविले. त्यामुळे लवकरात लवकर मार्केटमध्ये येऊन व्यापार करा अन्यथा तेथील सर्व स्टॉल हटवू अशी भूमिका नगरपरिषद कडून घेण्यात आली. याबाबत व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मार्केटमध्ये आंब्यांना ग्राहक येत नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर बसावे लागत आहे. अद्याप हंगाम संपला नाही, त्यामुळे आठ दिवसांची मुदत मागितली. मात्र पालिकेकडून आक्रमक भूमिका घेतली गेली असली तरी आम्ही पुढचे आठ दिवस इथेच व्यापारासाठी बसणार आहोत असे ते म्हणाले. यावेळी अनिल मठकर, विमल पावसकर, आरती मठकर, श्याम सांगेलकर, राजा खोरागडे, दिपाली राऊळ, सुलभा जामदार, सुषमा राऊळ, रेश्मा खोडागरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMarketबाजारSawantwadiसावंतवाडी