शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: देवगड तालुक्यात आंबा कलमांना जूनमध्येच बहारदार पालवी, बागायतदारांच्या आशा पल्लवित

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 10, 2025 19:36 IST

मे महिन्यात पडलेल्या पावसाचा परिणाम

अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : यावर्षी पावसाने मे महिन्याच्या २० तारीखलाच सुरुवात झाल्याने तालुक्यामध्ये आंबा कलमांना जून महिन्याच्या सुरुवातीला बहारदार अशी पालवी येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे तालुक्यातील सर्व हापूस कलमे बहारदार पालवीने सजल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील ८० टक्क्यांहून अधिक कलमांना बहारदार अशी पालवी आल्याचे दिसून येत आहे. ही पालवी टिकविण्यासाठी व किडींपासून संरक्षण मिळण्यासाठी कीटकनाशक फवारण्या बागायतदार करीत असल्याचेही दिसून येत आहे. पूर्वी चैत्र महिन्यामध्ये आंबा कलमांना पालवी येण्याचे प्रमाण जास्त होते.गेल्या काही वर्षांपासून आंबा कलमांना चैत्र महिन्याऐवजी कलम मोहरण्याच्या वेळेला म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात पालवी येत होती. यामुळे आंबा उत्पादनावर याचा मोठा परिणाम होत होता. मात्र, यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच बहारदार अशी आंबा कलमांना पालवी आली आहे.

पालवी टिकविण्यासाठी बागायतदार सक्रियही पालवी टिकविण्यासाठी कीटकनाशक फवारण्या येथील बागायतदार करीत आहेत, तसेच कलमांना खते घालण्याची कामेदेखील बागायतदार करीत आहेत. या आलेल्या पालवीचे कीटकांपासून संरक्षण होऊन पालवी टिकल्यास येणारे आंबा पीक हे समाधानकारक येऊ शकते, असे मत जाणकार आंबा बागायतदारांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

बहारदार पालवीने बागायतदारांच्या आशा पल्लवितआंबा कलमांना आलेल्या बहारदार पालवीला ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये दुबार पालवी न येता या कलमांना मोहरच येऊ शकतो. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला असता देवगड हापूस कलमांना आंबा मोहर येण्याच्या वेळेलाच नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पालवी येत होती. यामुळे उत्पादनावर परिणाम होत होता. यावर्षी मात्र तालुक्यामध्ये आलेल्या बहारदार पालवीमुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.