शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंगलमुर्ती मोरया!, सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन

By सुधीर राणे | Updated: September 19, 2023 12:20 IST

कणकवली : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात आज, मंगळवारी सिंधुदुर्गात ३१ ठिकाणी सार्वजनिक तर ७१ हजार ७८९ ...

कणकवली : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात आज, मंगळवारी सिंधुदुर्गात ३१ ठिकाणी सार्वजनिक तर ७१ हजार ७८९ ठिकाणी घरगुती अशा एकूण ७१ हजार ८२० ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान थोर दंग झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. सिंधुदुर्गसह कोकणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी गेल्या एक महिन्यापासून अधिक काळ सुरु होती. भाद्रपद महिना सुरु झाला आणि या तयारीने आणखीनच वेग घेतला होता. अखेर भाद्रपद शुध्द चतुर्थीला म्हणजेच मंगळवारी गणरायाची भावपूर्ण वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली. गणेशचतुर्थीच्या दिवशी होणारी तारांबळ टाळण्यासाठी काही ठिकाणी रविवारी तर काही जणांनी सोमवारी श्री गणेश मूर्ती घरी आणून ठेवल्या होत्या. तर काही ठिकाणी मंगळवारी सकाळी गणरायाचे आगमन झाले. सकाळपासूनच गणरायाच्या पूजेसाठी अनेक घरात लहान थोर मंडळींची लगबग सुरु होती. ढोल, ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी अनेक ठिकाणी सुरू होती. श्री गणेश मुर्तीची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आरतीही करण्यात आली. उकडीच्या एकविस मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात आला. प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने तसेच प्रत्येकाच्या रुढीनुसार दीड, पाच, सात, नऊ, अकरा, सतरा, एकोणिस, एकविस, बेचाळीस असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने सर्वत्र वातावरण भारावलेले राहणार आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. पोलिस प्रशासनही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सज्ज आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग