शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मणेरी पाईपलाईनचे काम निकृष्ट

By admin | Updated: May 21, 2015 00:04 IST

दर्जेदार नसल्याचा ठोस पुरावा : जीवन प्राधिकरणचे पितळ उघडे

कसई दोडामार्ग : मणेरी येथून नदीचे पाणी उपसा करून वेंगुर्ले येथे नेण्यासाठी पाईप लाईनची टेंडर देण्यात आली. पाईप लाईन फुटली आणि जीवन प्राधिकरणचे पितळ उघडे पडले. पाईपलाईनचे काम दर्जेदार झाले नसल्याचा हा ठोस पुरावा असल्याने काम त्वरित बंद करून दर्जेदार काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तिलारी नदीचे पाणी मणेरी नदीतून उपसा करून वेंगुर्ले येथे नेण्याची जीवन प्राधिकरणची योजना सुरू आहे. मणेरी ते बांदा, बांदा ते वेंगुर्ले राज्यमार्गाची साईडपट्टी खणून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. जमिनीला लागूनच पाईपलाईन टाकण्यात येत असून, नंतर पाईपला वेल्डिंग मारण्यात येते. मात्र, पाईपलाईन जमिनीबरोबर असल्याने खालून पाईपला वेल्डिंग मारणे अशक्य आहे. असे असताना वेल्डिंग मारण्यात आले, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. तसेच वेल्डिंग मारलेल्या ठिकाणी सिमेंट लावण्यात आले. तसेच पाईप जॉर्इंटच्या ठिकाणी लहान साईजचे दर्जेदार नसलेले पाईप वापरण्यात येत आहे. सासोली येथे जॉर्इंटचा पाईप फुटल्याने पाईपचा दर्जा स्पष्ट झाला. एकंदरीत काम एस्टिमेंटप्रमाणे न झाल्याने पाईपलाईन फुटली. त्यामुळे लाईनचा आम्हाला धोका आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाईपलाईन टाकताना जमीनमालकांची परवानगी घेणे आवश्यक होते. जमीनमालकांना नुकसान भरपाई देणे बंधनकारक होते. रस्ता बांधकाम विभागाचा असला, तरी जमिनी नाहीत. लोकांच्या सेवेसाठी म्हणून हा रस्ता बांधकाम विभागाला दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे या लाईनचे काम बेकायदेशीर होत आहे. याच्याशी काहीही संबंध नसलेल्या लोकांना केवळ गप्प राहण्यासाठी लाखो रुपये देण्यात आले. नाहरकत दाखल्यांसाठी पैसे मोजण्यात आले. मात्र, खरोखरच जे रस्त्याचे मालक आहेत, त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली, असे आरोप होत आहे. त्यामुळे या पाईपलाईनचे काम बंद करावे. प्रकल्पाची एस्टिमेंट कॉपी सर्वांसाठी खुली करावी व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पुन्हा काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)