शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

समाजविघात रोखण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: July 10, 2014 00:20 IST

संदेश पारकर : कणकवलीत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन

कणकवली : महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. ही परंपरा जपण्याचे काम सिंधुदुर्गातील भजन मंडळे करीत आहेत. सिंधुदुर्गला आध्यात्मिकतेचा वारसा लाभला असून समाजविघातक घटना रोखण्यासाठी भजन मंडळांनी पुढाकार घ्यावा. भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करावे, असे आवाहन कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी येथे केले.सिंधु संप्रदाय भजन संस्था कणकवली व संदेश पारकर मित्रमंडळाच्यावतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून येथील प.पू. भालचंद्र महाराज आश्रमात जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी संदेश पारकर बोलत होते. यावेळी प.पू. भालचंद्र महाराज आश्रम समितीचे अध्यक्ष सुरेश कामत, सचिव विजयकुमार वळंजु, व्यवस्थापक विजय केळुसकर, अवधूत मालणकर, नीलेश धडाम, भजनीबुवा भास्कर गावडे, प्रकाश पारकर, सुदर्शन फोपे, श्रीकांत तेली, गोपी लाड, प्रकाश सामंत, स्पर्धेचे परीक्षक मोहन मेस्त्री, प्रमोद मेस्त्री आदी यावेळी उपस्थित होते.संदेश पारकर म्हणाले, समाजाचे आपण काही देणे लागतो. या भावनेने जर प्रत्येक व्यक्तीने काम केले तर समाजविकास निश्चितच होईल. संत परंपरा जोपासत असलेल्या भजनी कलाकारांना राजाश्रय मिळावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. यामध्ये भजनी कलाकारांचे सहकार्य अपेक्षीत आहे. सुरेश कामत म्हणाले, भजन स्पर्धेच्या माध्यमातून भजनी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. पारकर यांचे अशा समाजोपयोगी उपक्रमांना नेहमीच सहकार्य असते. त्यामुळे त्यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना जनतेचाही नेहमीच प्रतिसाद लाभत असतो. विजयकुमार वळंजु यांनी विचार मांडले. स्वागत भास्कर गावडे यांनी तर सूत्रसंचालन प्रकाश पारकर यांनी केले. (वार्ताहर)