शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाच्याच्या लग्नाला जाताना मामाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: February 14, 2016 00:58 IST

वालावल येथील घटनेने हळहळ : लग्नादिवशीच पावसकर कुटुंबीयांवर काळाचा घाला

कुडाळ : भाच्याच्या विवाहासाठी जाताना झालेल्या अपघातात डंपरच्या चाकाखाली सापडून सुरेंद्र वामन पावसकर (वय ४८, रा. पावशी) हे जागीच ठार झाले. हा अपघात कुडाळ-कवठी रस्त्यावर वालावल (आंबेडकरनगर) येथे शनिवारी सकाळी घडला. लग्नाच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने या दुर्घटनेने पावसकर कुटुंबीयांच्या आनंदोत्सवाचे क्षणात दु:खात रूपांतर झाले. अपघातस्थळी नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळेही पाणावले. सुरेंद्र पावसकर यांचा भाचा योेगेश आडेलकर याचा शनिवारी पावशी येथे लग्नसोहळा होता. सकाळी ते आपला मेहुणा सखाराम रेडकर (रा. वेंगुर्ले) यांच्यासमवेत दुचाकीने वालावल येथे जात होते. त्यांच्यासोबत लग्नासाठी सजविण्यात येणाऱ्या गाडीवर लावण्यासाठी वधू-वरांची थर्माकोलमध्ये कोरलेली नावे होती. कुडाळ-कवठी रस्त्यावर वालावल (आंबेडकरनगर) येथे त्यांच्या दुचाकीपुढे डंपर जात होता. याचवेळी वाळूने भरलेला डंपर कुडाळच्या दिशेने येत होता. कवठीकडे जाणाऱ्या डंपरच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात गाडीचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्यानजीकच्या खड्ड्यात जाऊन पडली व पावसकर हे डंपरच्या मागील चाकाखाली सापडले. यात त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर घटनास्थळी निवती पोलीस ठाण्याचे जानकर यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या अपघातात सखाराम रेडकर यांच्या हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर वालावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी कुडाळ येथे नेण्यात आला. कवठी रस्ता वाहतुकीला अयोग्य : चिपी विमानतळाकडे जाणारा कवठी-वालावल हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वालावल ग्रामस्थांनी आवाज उठविला होता. मात्र, याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. आनंदाचा पारावर अन् दु:खाचा डोंगर पावसकर यांच्या घरात लग्न असल्याने गेले चार दिवस या कुटुंंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शनिवारी लग्नाच्या दिवशीही आनंदाचे वातावरण होते. पण पावसकर यांच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच क्षणात आनंदाचे रूपांतर दु:खात झाले.