शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मालवणच्या '१०० इडियट्स'चे 'सोशल' कार्य

By admin | Updated: May 25, 2016 23:25 IST

‘व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप’च्या माध्यमातून : संविता आश्रमाला ३० हजारांची मदत

मालवण : सोशल मीडियाच्या वाढत्या जाळ्यात तरुणाई भरकटत चालली आहे. फेसबुक, व्हाट्स अ‍ॅप, आदी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सदुपयोग करण्यापेक्षा दुष्परिणाम अधिक होतो. यात युवा पिढीला 'याड' लागल्याची ओरड होते. यात काही तिळमात्रही शंका नाही. असे असले तरी मालवणच्या '१०० इडियट्स'नी मात्र युवा पिढी आणि समाजासमोर अनोखा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक चळवळीत आपलंही थोडं योगदान राहावं, या उद्देशाने मालवणच्या तरुणांनी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून तब्बल ३0 हजार रुपये जमा करीत पणदूर येथील संविता आश्रमला मदत केली आहे. या '१00 इडियट्स' ग्रुपचे अ‍ॅडमिन सीझर डिसोजा यांच्या हस्ते सोमवारी संविता आश्रमचे संदीप परब यांच्याकडे मालवण येथे ही मदत देण्यात आली. या माध्यमाच्या दुष्परिणामांची कितीही चर्चा होत असली तरी या माध्यमाचा सदुपयोग केल्यास सामाजिक चळवळीसाठी त्याचा फार मोठा हातभार लागू शकतो, हे मालवण मधील ‘१०० इडियट्स’ व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपने दाखवून दिले. त्यामुळे 'सोशल' मीडियासह त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाढदिवस साजरा न करता तब्बल जमा झालेले ३० हजार रुपये त्यांनी अणावच्या संविता आश्रमास मदत स्वरूपात सुपूर्द केले.यावेळी राजू बिडये, अभय कदम, मयू पाटकर, पास्कोल पिंटो, ऋषी बिडये, हरेश देऊलकर, महेश सारंग, सदू आचरेकर, जॉमी ब्रिटो, नुपूर पाटील, विली डिसोजा, नीलेश गवंडी, युवराज चव्हाण व सदस्य उपस्थित होते. अन् क्षणात राहिले ३० हजार रुपये उभेमालवण येथील काही युवकांनी एकत्र येत या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपमधील एका सदस्याचा सोमवारी वाढदिवस होता. मात्र, हा वाढदिवस आगळावेगळा करण्याचा संकल्प या युवकांनी केला. त्यानुसार मयू पाटकर, राजेश पारधी यांनी या वाढदिवसानिमित्त पार्टी, भेटवस्तू असा वायफळ खर्च न करता जिल्ह्यात अनाथांच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या 'संविता आश्रमा'स काही मदत देण्याची संकल्पना मांडला. ही संकल्पना सर्व सदस्यांच्या पसंतीस उतरल्याने बघता बघता काही क्षणात तब्बल ३० हजारांची रक्कम उभी राहिली.