शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर, महेश सरनाईक यांना कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 18:56 IST

मालवण तालुका पत्रकार समितीच्यावतीने दिले जाणारे सन २०२०-२१ या वर्षाचे तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार जाहीर.

मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्यावतीने दिले जाणारे सन २०२०-२१ या वर्षाचे तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार अध्यक्ष संतोष गावडे यांनी आज, शनिवारी जाहीर केले.  कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार लोकमत सिंधुदुर्गचे वरीष्ठ उपसंपादक तथा आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार संदीप बोडवे तर पत्रकार अमित खोत पुरस्कृत 'बेस्ट स्टोरी अवार्ड' हा विशेष पुरस्कार लोकमतचे मालवण प्रतिनिधी पत्रकार सिद्धेश आचरेकर यांना जाहीर झाला आहे. ५ जानेवारीला धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.मालवण तालुका पत्रकार समितीची सभा शनिवार २५ डिसेंबर रोजी धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे समिती अध्यक्ष संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विद्याधर केनवडेकर, सचिव कृष्णा ढोलम, खजिनदार सिद्धेश आचरेकर, उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सहसचिव परेश सावंत यांच्यासह तालुक्यातील समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीत पुरस्कारांची घोषणा तसेच अन्य विषयांवर चर्चा झाली.दरवर्षी ६ जानेवारीला होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. त्यानुसार हा सोहळा ५ जानेवारीला निश्चित करण्यात आला आहे. संस्कार हॉल येथे सकाळी १० वाजता मान्यवर, निमंत्रित यासह पत्रकार सदस्य व कुटुंबीयांच्या उपस्थितीत पत्रकार पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात उत्कृष्ट सेवा बजावणारे राजेश पारधी, मालवण पंचायत समितीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त अमित खोत आणि पोईप सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत विजयी झालेल्या संतोष हिवाळेकर या पत्रकारांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली आहे.तहसीलदार, उपमुख्यकार्यकरी अधिकारी यांचा विशेष सत्कारमालवण पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या तीन पत्रकार पुरस्कारसह प्रशासकीय सेवेत सर्वोत्कृष्ट व लोकाभिमुख सेवा बजावत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तहसीलदार अजय पाटणे, उपमुख्यकार्यकरी अधिकारी राजेंद्र पराडकर या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही विशेष सत्कार या सोहळ्याच्या निमित्ताने केला जाणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग