शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

मालवण देवलीत डोंगर खचला

By admin | Updated: June 30, 2016 00:06 IST

पावसाचा हाहाकार : सहा कुटुंबीयांचे स्थलांतर

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर चार दिवस धुवाधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मालवण तालुक्यातील देवली-वाघवणे येथे डोंगर खचण्याची घटना घडली आहे. येथील वसंत कृष्णा चव्हाण व बाळाजी गोपाळ चव्हाण कुटुंबीयांच्या घराची संरक्षक भिंत कोसळल्याने लगतच्या सहा घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. महसूल प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत सहाही घरांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, डोंगर धोकादायक असल्याने प्रशासनाने डोंगर माथ्यावर वसलेल्या ४० कुटुंबांना यापूर्वीच स्थलांतराच्या नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार वाघवणेवाडीतील ग्रामस्थांनी वाघवणे सडा येथे शेत मांगरात स्थलांतर केले आहे. ज्या कुटुंबाना राहण्याची व्यवस्था नाही, अशा कुटुंबांची प्राथमिक शाळा अथवा ग्रामपंचायत कार्यालयात व्यवस्था केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात १३४ मि.मी.च्या सरासरीने १०७४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मालवण तालुक्यात दिवसभरात १३६ मि.मी.पावसासह महिन्याभरात १४९३ मि.मी. एवढा विक्रमी पाऊस कोसळला आहे. मालवण शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही ही स्थिती आहे. मालवण बाजारपेठेतही अनेक रस्ते पाण्याखाली गेले. काही दुकाने, घरातही पाणी घुसल्याचे चित्र होते. देवली-वाघवणे-मधलीवाडी येथे डोंगराचा काही भाग खचण्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. डोंगरावर वसलेल्या वसंत चव्हाण व बाळाजी चव्हाण यांच्या नव्याने दुरुस्ती करण्यात आलेल्या घरालगत असलेली भली मोठी संरक्षक भिंत खचली आहे. यात दगड-माती कोसळल्याने घराच्या छपराचा काही भाग खाली कोसळला. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळल्याने धोकदायक स्थिती निर्माण झाली आहे. खचलेल्या भितींच्या खाली असलेल्या पुंडलिक चव्हाण गंगाराम चव्हाण, अनुसया चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, एकनाथ चव्हाण, रमेश सावंत यांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. या घरातील लहान-मोठ्या सर्वांनीच स्थलांतर करताना वाघवणे सडा येथील शेतमांगरात आसरा घेतला आहे. (प्रतिनिधी) तहसीलदारांकडून पाहणीवाघवणे येथे डोंगराचा काही भाग खचल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार वनिता पाटील यांनी तत्काळ दखल घेतली. नायब तहसीलदार जी. के. सावंत, तलाठी श्रीमती शिवलकर, कोतवाल देऊलकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाहणी केली. देवली सरपंचांशी संपर्क साधून तत्काळ उपाययोजना हाती घेतल्या, तर धोकादायक बनलेल्या वसंत व बाळाजी चव्हाण कुटुंबीयांशी मुंबईत संपर्क साधून त्यांना तत्काळ पाचारण करण्यात आले आहे. जवळची सर्व घरे खाली करून कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यात आले आहे.तळाशील येथे घर कोसळलेकिनारपट्टीवरील तळाशील येथे भरत कोचरेकर यांचे घर मुसळधार पावसात कोसळले. यात ७० हजारांचे नुकसान झाले आहे. तर वायरी येथील कोळगे कुटुंबीयांच्या घरावर चिंचेचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. तसेच शहरात पालिकेसमोर आंब्याचे झाड वीज वाहिन्यांवर कोसळले. तर तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. या साऱ्या प्रकारात नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, महेंद्र म्हाडगूत, सन्मेश परब, हरी खोबरेकर यांसह अन्य नगरसेवक, लोकप्रतिनिधी आपत्ती स्थितीत मदतकार्यात सहभागी झाले होते. वीज कर्मचारी, पालिका कर्मचारी यानाही तारेवरची कसरत करावी लागत होती.पेंडूर येथे पडझडमुसळधार पावसाचा फटका पेंडूर खरारे येथील गोपाळ लक्ष्मण वालावलकर कुटंबीयांनाही बसला. त्यांची विहीर कोसळून सुमारे दोन लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे. तर खरारे येथील कल्पना अशोक सावंत यांची चिरेबंदी भिंत कोसळली. यात शौचालयासह २५ हजारांचे नुकसान झाले आहे. तर पोईप- देऊळवाडी येथील जयवंत पोईपकर यांच्या शेतमांगरावर चिंचे झाड कोसळले. यात मांगराचे मोठे नुकसान झाले, तर एक बैलही जखमी झाल्याने दोन लाखांचे नुकसान झाले आहे.