शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

मालवणला मुसळधार पावसाने झोडपले

By admin | Updated: June 28, 2016 00:34 IST

तालुक्यात लाखोंचे नुकसान : वादळाचा तडाखा

मालवण : मालवण तालुक्यात सोमवारी दिवसभर मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. सकाळी वादळी वाऱ्याने किनारपट्टी भागाला मोठा फटका बसला असून, मालवणसह देवबाग, वायंगणी गावाला वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने पाच लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. समुद्रही खवळला असून, अजस्र लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. सोमवारी दिवसभर पावसाच्या दमदार सरींनी हजेरी लावल्याने मालवणात ठिकठिकाणी पाणी साचले होते, तर ग्रामीण भागात पडझडीमुळे लाखोंची हानी झाली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. शहरातील गटारे, तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पादचाऱ्यांना चिखलाशी सामना करावा लागत होता. बंदर विभागाने समुद्रात लावलेला ‘बोया’ लाटांबरोबर किनाऱ्यावर आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी समुद्रात जलसमाधी मिळालेल्या बोटींचे अवशेष किनाऱ्यावर वाहून आले आहेत. मालवण तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून, जून महिन्यात १३०० मि.मी.ची पावसाने बरसात केली आहे. येत्या ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्यात पडझड : लाखोंची हानीमालवण शहरातील किनारपट्टी भागाला सकाळी वाऱ्यांचा फटका बसला. किनाऱ्यालगत मत्स्य व्यावसायिक ताम्हणकर यांच्या मत्स्य सेंटरलगत माड कोसळला, तर लगतची काही घरे व दुकाने यांचे पत्रे व छपराचा काही भाग उडून गेला. शहरातील सेवांगण मार्गावरील वीज वाहिनीवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला, तर काही काळ मार्गही बंद होता. तालुक्यातील वायंगणी तिठा येथील विष्णू शांताराम साळकर यांच्या गणेशमूर्ती शाळेवर आंब्याचे झाड कोसळल्याने सुमारे दोन लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे. मूर्तिशाळेतील नव्वद गणेशमूर्ती तुटून गेल्या आहेत. याबाबत वायंगणी सरपंच प्रज्ञा धुळे, उपसरपंच हनुमंत प्रभू, ग्रामस्थ, तलाठी, पोलिस पाटील यांनी मदतकार्य करून पंचनामा केला. सभापती हिमाली अमरे यांनी भेट देऊन तातडीने ताडपत्रीची व्यवस्था केली, तर वायंगणी पाटवाडी येथील रस्त्यावरच विद्युत वाहिनीवर जांभळाचे झाड पडल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. धोकादायक जांभळाच्या झाडाबाबत यापूर्वी वीज वितरणला माहिती देण्यात आली होती; मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)देवबागात बोटींचे नुकसानसोमवारी सकाळी वाऱ्याचा तडाखा देवबाग गावालाही बसला. किनाऱ्यालगत ठेवलेल्या तीन मासेमारी फायबर बोटींवर झाड कोसळल्याने दोन बोटी फुटल्या आहेत. यात गोपाल मधुसूदन कुमठेकर यांच्या एका बोटीने एक लाख, तर लक्ष्मण गणपत चिंदरकर यांच्या दोन बोटींचे मिळून एक लाख २० हजारांचे नुकसान झाले. याबाबत महसूल विभागाला माहिती दिली असता आपल्याकडे केवळ घर व गोठे यांचे नुकसान नोंदविले जाते असे सांगितले.मत्स्य विभागाकडेही कोणतीही नुकसानभरपाईची तरतूद नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत माजी उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.