शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सावंतवाडीत भरा घरबसल्या कर

By admin | Updated: October 2, 2016 23:29 IST

वेबसाईटचे उद्घाटन : सावंतवाडी शहराच्या परिपूर्ण माहितीचाही समावेश

 सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या वेबसाईटचे उद्घाटन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेबसाईटद्वारे नागरिकांना घरबसल्या आॅनलाईन पद्धतीने घरपट्टीसारखे कर भरता येणार आहेत. शनिवारी ई-गव्हर्नर्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. येथील नगरपरिषेच्या लोकमान्य टिळक सभागृहात या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, नगरसेवक संजय पेडणेकर, विलास जाधव, देवेंद्र टेमकर, नगरसेविका अफरोज राजगुरू, कीर्ती बोंद्र्रे, शर्वरी धारगळकर, वैशाली पटेकर, योगिता मिशाळ, साक्षी कुडतरकर, क्षिप्रा सावंत, आदी उपस्थित होते. ‘२ं६ंल्ल३६ं्िरू्र३८.ङ्म१ॅ’ या वेबसाईटचे अनावरण करताना नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले की, सावंतवाडी नगरपरिषद आॅनलाईन करण्यासाठी २०१२ सालापासून नगरपरिषद कार्यरत आहे. यामध्ये सावंतवाडी शहराच्या परिपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.ही सुविधा उपलब्ध करून देणारी सावंतवाडी ही जिल्ह्यातील पहिली नगरपरिषद असून, घरपट्टी कोठूनही आणि कधीही भरता येणार आहे. तसेच आॅनलाईन पेमेंट गेटवेमार्फत घरपट्टी भरून घरच्या घरी पावती मिळणार आहे, अशी माहिती साळगावकर यांनी दिली यामध्ये नागरिकांना घरपट्टी आॅनलाईन पेमेंट गेटवेमार्फत भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सावंतवाडी शहराची माहिती, शहराचा इतिहास, पर्यटनाची माहिती, नगरपरिषदेचे विविध कार्यक्रम, प्रोजेक्टस् यांची माहिती, नागरिकांना आवश्यक अर्ज नमुने, निविदा यांची आॅनलाईन माहिती, जन्म-मृत्यूच्या नोंदणी आॅनलाईन पाहता येणार असून, नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी आॅनलाईन बघण्याची सुविधा तसेच इतर सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर सावंतवाडी नगरपरिषद लवकरच १८००२३३२०४७ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपली कामे सोयीस्करपणे करता येणार असल्याचेही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. ही वेबसाईट सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रथमेश कसालकर यांनी तयार केली असून, भविष्यात नगरपरिषदेचा मोबाईल अ‍ॅप तयार करणार असल्याची माहिती कसालकर यांनी दिली. दरम्यान सावंतवाडी नगरपरिषदेच्या दवाखान्यात भगवान महावीर यांच्या छायाचित्राचे अनावरण सुवर्णा मुढाळे यांच्या हस्ते करण्यात आले. बॅ. नाथ पै सभागृहाच्या गॅलरीमध्ये नाट्यकर्मी कै. दिनकर धारणकर यांच्या तैलचित्राचे अनावरण त्यांच्या पत्नी उषा धारणकर यांच्या हस्ते करण्यात आले.