शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

इंधन समायोजन शुल्क, जूनमध्ये वीज बिलात २४ टक्के वाढ; सर्वसामान्य नागरिकांना फटका

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 6, 2024 18:08 IST

प्रति युनिट चार्ज किती ?

सिंधुदुर्ग : महावितरणने पाठवलेल्या बिलात इंधन समायोजन शुल्क आकारले जात आहे. वीज संकटाच्या काळात खरेदी केलेल्या अतिरिक्त विजेपोटी हे शुल्क आकारले जाते. हे शुल्क ग्राहकांच्या बिलात प्रती युनिट आकारण्यात आले आहे.१०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी ४० पैसे, १०१ ते ३०० युनिटसाठी ७० पैसे, ३०१ ते ५०० युनिटसाठी ९५ पैसे, त्यापेक्षा जास्त वापरासाठी १.०५ पैसे प्रति युनिट या शुल्काच्या नावावर प्रति युनिट वसुली करण्यात आली आहे. यासोबतच मे हिटमुळे विजेचा वापर वाढला. याचा परिणाम वीज बिल वाढण्यावर झाला आहे.वीज वितरण कंपनीने वीज बिलामध्ये २४ टक्के दरवाढ केल्याने त्याचा फटका थेट ग्राहकांना बसला आहे. मे महिन्याच्या हीटमुळे विजेचा वापर वाढला. यातच ३४.५ टक्के युनिटमध्ये दरवाढ झाली. यासोबतच इंधन अधिभार, फिक्स चार्ज यामुळेदेखील विजेचे बिल वाढले आहे. वीज बिलातील झालेली ही दरवाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला न परवडणारी आहे. यामुळे दररोज वाढीव बिलाच्या तक्रारी घेऊन शेकडो नागरिक वीज वितरण कंपनी कार्यालयात धडकत आहेत. यातून गोंधळ वाढला आहे.

फिक्स चार्ज वाढलेशहरी भागातील फिक्स चार्जमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे सिंगल फेज कनेक्शनसाठी हे शुल्क ११६ रूपयांवरून १२८ रूपये करण्यात आले आहेत.

श्रेणी बदलली की वाढतो दर१०० युनिटपर्यंत ४.७१ पैसे प्रति युनिट दर निर्धारित करण्यात आला आहे. १०१ युनिट ते ३०० युनिटपर्यंत प्रत्येक युनिटसाठी १०.२९ पैशांचा दर निर्धारित करण्यात आला आहे.

प्रति युनिट चार्ज किती ?१ एप्रिलपासून नवीन वीज दर लागू करण्यात आले आहेत. ही वाढ सुमारे पाच टक्के आहे. मात्र, इतर शुल्क जोडल्याने ही वाढ वाढली आहे. ही वाढ ९.८६ टक्क्यांवरून १०.४२ टक्क्यांपर्यंत पोहोचते.

२४ टक्क्यांपर्यंत वाढले बिलविविध कारणांमुळे झालेली वीज बिलवाढ ही २४.५ टक्क्यांपर्यंत गेली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. त्यासाठी दररोज अनेक ग्राहक वीज कंपनी कार्यालयात जात आहेत.

दर दोन ते तीन वर्षांपासून हेरिंग घेतलेले नाही. यामुळे अनेकांना मत मांडता आले नाही. ही दरवाढ मागे घ्यावी. - नंदन वेंगुर्लेकर, ग्राहकदरवाढीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा विचारच झाला नाही. याचा फटका आता सर्वसामान्यांना बसला आहे. - सुप्रिया ठाकूर, ग्राहक 

एप्रिल महिन्यापासून वाढीव वीज बिलासंदर्भात सूचना आल्या आहेत. नियमानुसार विजेचे बिल ग्राहकांना देण्यात आले आहे. सुधारित सूचनांचे पालन जून महिन्याच्या पहिल्या बिलात करण्यात आले आहे. - प्रशासकीय अधिकारी, महावितरण.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीज