शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्याच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची कणकवलीत सभा

By सुधीर राणे | Updated: November 29, 2023 13:13 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच होणार सभा

कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची सभा १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कणकवली पंचायत समितीच्या प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात मंडळाचे अध्यक्ष अभिनेते विजय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती या मंडळाचे सदस्य तथा ज्येष्ठ रंगकर्मी विजय चव्हाण यांनी दिली. कणकवली येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जेष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर उपस्थित होते.विजय चव्हाण म्हणाले, राज्यात अथवा देशात मराठी भाषेतून रंगभूमीवर सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची संहिता वाचन करून त्याचे परीक्षण करून त्याला परवानगी देण्याचे काम हे मंडळ करते. रंगभूमी आणि सांस्कृतिक कामात योगदान दिलेल्या दिग्गजांची निवड या समितीवर केली जाते. या बैठकीला शासनाचे प्रतिनिधी म्हणून या मंडळाचे सचिव संतोष खामकर हे उपस्थित राहणार आहेत.याशिवाय दिलीप वाघमारे, दत्तात्रय कुंभार, संतोष साठे हे शासकीय अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. आजवर रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची (सेन्सॉर बोर्ड) सभा या पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक सारख्या मोठ्या शहरांत होत असतात. संपूर्ण महाराष्ट्रात सेन्सॉर बोर्डचे ४५ सदस्य असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच रंगभूमी सेन्सॉर बोर्डची सभा १ डिसेंबर रोजी होत आहे.ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ही कलाकारांची भूमी आहे. दशावतार ही कोकणची लोककला असून घराघरांत कलाकार आहेत. सिंधुदुर्गातील सर्व रंगकर्मीसाठी जिल्ह्यात रंगभूमी सेन्सॉर बोर्डची होणारी सभा ही एक सुवर्णसंधी आहे. सिंधुदुर्गातील रंगकर्मी आणि सांस्कृतिक चळवळ याबाबत या सभेनंतर खुली चर्चा होणार आहे. यासाठी सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन विजय चव्हाण यांनी केले. ते म्हणाले, रंगभूमी सेन्सॉर बोर्डच्या सभेत सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र देणे, अथवा काही परीनिरीक्षणात उणिवा, त्रुटी, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बाबी आढळल्या तर त्यावर मंडळाच्या सदस्यांनी हरकती घेत जे पर्याय सुचवलेले असतात त्याबाबत संबंधित लेखकाने सादर केलेले खुलासे, आपले स्पष्टीकरण यावर विचारविनिमय करून सेन्सॉर सर्टिफिकेट देण्याबाबत निर्णय घेतला जातो. रंगभूमी कालची ,आजची आणि उद्याची अधिक सकस कशी होईल याबाबत सर्वंकष विचार होऊन शासनाला शिफारसी केल्या जातात.असेही यावेळी विजय चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग