शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यासह महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात मोठा वाव : विजय सरदेसाई, वेंगुर्लेत आंतरराष्ट्रीय आंबा परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 16:29 IST

गोवा व महाराष्ट्र राज्याने एकत्रित येऊन कृषी क्षेत्रात विकास करावा. त्यासाठी गोव्याचे कायमच सहकार्य राहील, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा गोवा राज्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी येथे केले.

ठळक मुद्देगोव्यासह महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात मोठा वाव : विजय सरदेसाईवेंगुर्लेत आंतरराष्ट्रीय आंबा परिषद

वेंगुर्ले : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे उत्तम दर्जाचे कृषी विद्यापीठ असून, येथे मिळविलेल्या ज्ञानाच्या जोरावर आज मी कृषिमंत्री झालो. गोव्याबरोबरच महाराष्ट्रालाही कृषी क्षेत्रात मोठा वाव आहे. गोवा व महाराष्ट्र राज्याने एकत्रित येऊन कृषी क्षेत्रात विकास करावा. त्यासाठी गोव्याचे कायमच सहकार्य राहील, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा गोवा राज्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी येथे केले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर अ‍ॅडव्हॉन्मेंट आॅफ अ‍ॅग्रीकल्चरल सायन्सेस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेला सुरुवात झाली.या परिषदेत विदेशातील ४०, तर देशातील ३१२ शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्र्रेकर, डॉ. शंकरराव मगर, डॉ. किसन लवांदे, प्रमुख वक्ते डॉ. व्हिक्टर गॅलन, कृषी संशोधन स्पेनच्या प्रा. कॅनरी आयलँड, रिलायन्स ग्रुपचे माजी उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र्र गुंजाटे, डॉ. ए. के. सिंग, चार्ल्स डार्विंग युनिव्हर्सिटी आॅस्ट्रेलियाचे डॉ. पिंग लू, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. प्रदीप हळदवणेकर आदी उपस्थित होते. यावेळी विजय सरदेसाई यांचा डॉ. व्हिक्टर गॅलन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.परिषदेच्या पहिल्या दिवशी जागतिक पातळीवर आंब्याची सद्यस्थिती, वातावरणातील बदल, आनुवंशिकता आणि प्रजोत्पादन, अभिवृद्धी आणि नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन या विषयांवर चर्चासत्र झाले. परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.

 

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग