शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : वेळ आल्यास सडेतोड उत्तर देऊ : सतीश सावंत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 14:12 IST

आता नरडवे भागात कुणाचीही दादागिरी चालणार नाही. माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यापुढे धमक्या दिल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत कार्यकर्ता सांभाळणाऱ्यांपैकी मी एक आहे. वेळ आल्यास सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना महायुतीचे उमेदवार सतीश सावंत यांनी दिला.

ठळक मुद्देवेळ आल्यास सडेतोड उत्तर देऊ : सतीश सावंत यांचा इशारा नरडवे, फोंडाघाट भागात प्रचारसभा

कणकवली : आता नरडवे भागात कुणाचीही दादागिरी चालणार नाही. माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यापुढे धमक्या दिल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत कार्यकर्ता सांभाळणाऱ्यांपैकी मी एक आहे. वेळ आल्यास सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना महायुतीचे उमेदवार सतीश सावंत यांनी दिला.कणकवली तालुक्यात सतीश सावंत यांचा प्रचारदौरा सुरू आहे. त्याअंतर्गत नरडवे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते संदेश पारकर, बाळा भिसे, रमाकांत सावंत, व्हिक्टर डिसोझा, जयराम ढवळ, गणेश ढवळ, सोमा घाडीगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, आनंद आचरेकर आदी उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, माझ्या कार्यकर्त्यांच्या नखालाही धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर गप्प बसणार नाही. येत्या काळात नरडवे धरणाचा विषय मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.आपल्याला केवळ कागदावरचा विकास नको, तर जनतेचे प्रश्न कायमस्वरुपी सोडविणारा विकास हवा आहे. नरडवे धरणाचे काम पूर्ण झाले तर शेती व्यवसायाला चालना मिळणार आहे. यातून शेतकरी समृद्ध होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, अ‍ॅड. हर्षद गावडे, संदेश सावंत-पटेल, माजी सभापती आबू पटेल, रंजन चिके, फोंडाघाट विभागप्रमुख संजना कोलते, मिनल तळगावकर, सुभाष सावंत, संतोष सावंत, उदय ठाकूर, अनिल पटेल, भाई पटेल आदी उपस्थित होते .यावेळी नरडवे-राणेवाडी येथील स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये संतोष राणे, विजय राणे, रमेश राणे, शामसुंदर राणे, संचिता राणे, सायली राणे, शांताराम राणे, प्रतिमा राणे, विजया राणे, प्रभावती राणे, सुनंदा राणे, वामन राणे, काशिराम राणे, द्रौपदी राणे, प्रसाद भालेकर आदी ग्रामस्थांना शिवबंधन बांधत त्यांचे सावंत यांनी पक्षात स्वागत केले.राग-रूसवे दूर करून कामाला लागाफोंडाघाट येथे प्रचारसभेत सतीश सावंत म्हणाले, तुम्ही सर्वांनी ह्यमी सतीश सावंतह्ण असे समजून काम करा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आता शक्य होणार नाही. मात्र, राग-रुसवे दूर करून कामाला लागा. माझ्यासाठी आठ दिवस काम करा, मी तुमच्यासाठी पाच वर्षे काम करेन. शिवसेनेची निशाणी मतदारांच्या मनात रुजवा. त्यासाठी दिवस-रात्र एक करून कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

टॅग्स :kankavli-acकणकवलीSatish Sawantसतीश सावंत