शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

कुणकेश्वर यात्रेसाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: February 4, 2015 23:51 IST

आरोग्य विभागाचे यात्रा नियोजन : ३ रुग्णवाहिकांसह १२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

शिरगांव : देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना शासनाच्यावतीने आरोग्य विभागामार्फत विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून यात्रा काळात कोणत्याही आरोग्यविषयक समस्येला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. याचे योग्य नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देवगड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. कोंडके यांनी दिली आहे.श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे १७ फेब्रुवारीपासून यात्रेस सुरुवात होणार असून या यात्रेसाठी दूरदूरहून भाविक कुणकेश्वर येथे येतात. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्यविषयक सोयीसुविधा दरवर्षी पुरविण्यात येतात. याचे नियोजन आता पूर्ण झाले असून यात्रा कालावधीत २४ तास वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी चार आरोग्यपथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकेश्वर, देवळानजीक भक्तनिवास येथे, प्राथमिक आरोग्यकेंद्र मिठबांव व इळये येथे ही पथके असणार आहेत. प्रत्येक आरोग्य पथकास दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यिका, दोन आरोग्यसेविका, परिचर असे सहा कर्मचारी असणार आहेत.प्राथमिक आरोग्यकेंद्र मिठबांव व इळये येथे प्रत्येकी चार चार तर ग्रामीण रुग्णालय देवगड येथे १० कॉटची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा काळात देवगड येथील खासगी डॉक्टरांचाही रुग्णसेवेत सहभाग असणार आहे. २४ वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य पर्यवेक्षक, १४ आरोग्य सहाय्यक, १४ आरोग्य सहाय्यिका, २८ आरोग्य सेविका, २८ आरोग्य सेवक, ७ परिचर, २ औषध निर्माता, २ रुग्णवाहिका चालक असे १२३ कर्मचारी यात्राकाळात कार्यरत राहणार आहेत. कुणकेश्वर येथे एक सार्वजनिक नळयोजना, आठ खासगी सार्वजनिक विहिरी, ४३ खासगी विहिरी, दोन खासगी बोअरवेल असे एकूण ५४ पाण्याचे स्त्रोत आहेत. यांचे १ जानेवारी २०१५ पासून यात्रापूर्व तयारीकरीता पाणी नमुने घेण्यात आले असून १ फेब्रुवारीपासून नियमित पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे. पाणी शुद्धीकरणासाठी लागणारी टीसीएल पावडर व लिक्विड क्लोरीन बॉटल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. पाणी शुद्धीकरण व ओ. टी. परीक्षणासाठी चार टीम कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.भाविकांसाठी अभिरुची हॉटेलनजीक ६ शौचालये, ८ मुताऱ्या, ग्रामपंचायतीसमोर ४ शौचालये व ३ मुताऱ्या, भक्तनिवास येथे १५ शौचालये उपलब्ध करण्यात येणार आहेत. यात्रेच्या ठिकाणी असलेली हॉटेल्स, खाणावळी, शीतगृहे, भेलपुरी, आईस्क्रीम, हातगाड्या आदी व्यावसायिकांची आरोग्यदृष्ट्या पहाणी करून आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून घेण्यात येणार आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भक्तनिवास येथे आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रथमोपचार कक्षात सर्व अत्यावश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार असून पाणी शुद्धीकरणासाठी मेडीक्लोरचे वाटप करण्यात येणार आहे.श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत २४ तास चांगली सेवा पुरविण्यात येणार आहे असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. कोंडके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)फिरत्या रूग्णवाहिकांची तजवीजअतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अशा दोन पथकांची खास स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह फिरती रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. यात्रेच्या ठिकाणी कायमस्वरूपी दोन रुग्णवाहिका ठेवण्यात आलेल्या आहेत.