शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
5
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
6
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
7
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
8
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
9
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
10
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
11
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
12
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
13
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
15
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
16
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
17
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
18
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
19
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
20
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे

एम. किसानने ५७ हजार शेतकरी जोडले

By admin | Updated: August 12, 2015 23:18 IST

घरबसल्या मिळणार माहिती : मालवण तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ७२0 जणांकडून लाभ

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी  पीक पेरणीविषयी मार्गदर्शन, हवामानाचा अंदाज, रोग प्रादुर्भावावर उपाय आदी शेती उपयोगी माहिती शेतकऱ्यांना एस. एम. एस. द्वारे मिळू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ५७ हजार १९० शेतकरी ‘एम किसान’ पोर्टलच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. त्यामुळे घरबसल्या या शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज व रोगाविषयी माहिती समजू लागली आहे. केंद्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी किसान पोर्टल सुरु करण्यात आले असून यामध्ये कृषी संबंधित वेगवेगळ्या विषयाची माहिती उपलब्ध आहे. नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हवामान, किड, रोग नियंत्रण, बाजारभाव, पीक उत्पादन आदींबाबत एस. एम. एस. द्वारे माहिती कळते. केंद्रशासनाच्या या एम. किसान पोर्टलवर शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबरची नोंद करून एस. एम. एस. सुविधेद्वारे किड, रोग, पीक संरक्षण याबाबतचे विविध सल्ले दिले जात आहेत. ‘एम. किसान’ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत एस. एम. एस. सेवा दिली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात ६९७३, मालवण तालुक्यात ११७२०, कणकवली तालुक्यात ८४७५, वैभववाडी तालुक्यात ३८८४, कुडाळ तालुक्यात ७५७२, वेंगुर्ला तालुक्यात ३५७९, सावंतवाडी तालुक्यात ७७३३ व दोडामार्ग तालुक्यात ७२६४ असे एकूण ५७ हजार १९० शेतकरी या सेवेशी जोडण्यात आले आहेत.या मोफत एस. एम. एस. सेवेशी अधिकाधिक शेतकरी जोडले जावेत यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागातील कृषी सहाय्यकांसह कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट्य ठरवून देण्यात आले आहे. या नोंदणीकृत शेतकऱ्यांना शेतीविषयक फायद्याचे एस. एम. एस. येवू लागल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदाच होऊ लागला आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून एम. किसान ही पोर्टल सेवा राबविली. जिल्ह्यातील सर्व शेतकरी या योजनेमार्फत जोडले जावेत असे आदेशही देण्यात आले. मात्र, या योजनेची योग्य प्रसिद्धी न केल्याने शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत.शेतकऱ्यांनी नजीकच्या तालुका कृषी कार्यालयात जावून नावनोंदणी करून आपला मोबाईल नंबर कृषी अधिकाऱ्यांकडे द्यावा. त्यानंतर ज्या ज्या वेळी वातावरणातील बदल, पिकावर एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव होणे, त्यावर वापरण्यात येणारे किटकनाशक याबाबतचे एस. एम. एस. संबंधित शेतकऱ्यांना येण्यास सुरुवात होतील. २ लाख ४३ हजार ७0९ अद्याप वंचितजिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ८९९ एवढी आहे. त्यापैकी ५७ हजार १९० शेतकरी ‘एम. किसान’ या पोर्टल सेवेशी जोडले गेले असून तब्बल २ लाख ४३ हजार ७०९ शेतकरी या मोफत सेवेपासून वंचित राहिले आहेत. मुळात या योजनेचा उद्देश या शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत सांगण्यात न आल्याने हे शेतकरी वंचित राहिले आहेत.जास्तीत जास्त लाभ घ्या : वाकडेशेती क्षेत्रातील प्रगती साधण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एन. जी. वाकडे यांनी केले आहे.अद्यापपर्यंत जिल्ह्यात ५७ हजार १९० शेतकरी एम. पोर्टल किसान पोर्टलशी जोडले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत शेतकरी नावनोंदणीच्या बाबतीत समाधानकारक नाही. कारण महाराष्ट्रात सुमारे ४२ लाख शेतकरी एम. किसान पोर्टल सेवेचा लाभ घेत आहेत. सिंधुदुर्गातील ही संख्या वाढविण्यासाठी आॅगस्ट महिनाअखेर कमीत कमी १ लाख ५० हजार शेतकरी या सेवेशी जोडले गेलेच पाहिजेत. असे आदेश केंद्राकडून जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. कृषी सहाय्यकांसह कृषी अधिकारी, कर्मचारी यांना नोंदणीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.