शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावंत नार्वेकरांनी उमेदवारी मागे घ्यावी :विकास सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 11:22 IST

काँग्रेसशी बंडखोरी करून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवित असलेले दिलीप नार्वेकर हे पक्षाचे आजपर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून गणले जात होते. त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मात्र, उमेदवारी मागे न घेतल्यास त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई केल्यास पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी दिला. 

ठळक मुद्देनिष्ठावंत नार्वेकरांनी उमेदवारी मागे घ्यावी :विकास सावंत वरिष्ठांनी कारवाई केल्यास पाठीशी घातले जाणार नाही

सावंतवाडी : काँग्रेसशी बंडखोरी करून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवित असलेले दिलीप नार्वेकर हे पक्षाचे आजपर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून गणले जात होते. त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मात्र, उमेदवारी मागे न घेतल्यास त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई केल्यास पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी दिला. दरम्यान, आगामी काळात जिल्हा परिषदसह सावंतवाडी पंचायत समिती सभापती व वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापतीपद ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी संबंधित सदस्यांना व्हीप बजावण्यात येणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी सावंत म्हणाले, नार्वेकर यांनी आपण प्रदेशाध्यक्षांचे पत्र आणले, असे सांगितले. मात्र, ते पत्र बोगस आहे. थोरातांची सही स्कॅन करून ते लिहिले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल. ती सही आपली नाही याबाबत खुद्द थोरात स्पष्टीकरण देणार आहेत. त्यामुळे निष्ठावंत असलेल्या नार्वेकरांनी माघार घ्यावी.

अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही त्यांचा यथोचित सन्मान करू. त्यांच्यावर ज्या कारवाया होतील त्या मागे घेण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, त्यांनी तसे न केल्यास त्यांच्यासह त्यांच्यासोबत फिरणाऱ्या अन्य कार्यकर्त्यांवरही कारवाईचा प्रस्ताव आपण वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे.सावंत पुढे म्हणाले, सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जात आहे.राज्यात अशा प्रकारचे धोरण ठरलेले आहे. त्यामुळे यापुढे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक, सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक व वेंगुर्ला पंचायत समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून संबंधित सदस्यांना व्हीप बजावण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग