शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

लोरेतील पुलाला भगदाड

By admin | Updated: September 25, 2016 23:18 IST

शिवगंगा नदीच्या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक

वैभववाडी : शनिवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने वैभववाडी तालुक्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, देवघर प्रकल्पाच्या विसर्गामुळे आलेल्या महापुरामुळे लोरेतील शिवगंगा नदीच्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांच्यासमवेत पुलाची पाहणी केली, तर स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पुलाला पडलेल्या भगदाडाची पाहणी करून तात्पुरती डागडुजी केली. त्यामुळे छोट्या वाहनांची जा-ये सुरू झाली आहे. मात्र, सध्या शिवगंगा नदीच्या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने येथून वर्दळ टाळावी, असे आवाहन महसूल व पोलिस प्रशासनाने केले आहे. वैभववाडी तालुक्यात दोन दिवस पडलेल्या पावसाची २७६ मि.मी. एवढी नोंद झाली आहे. शनिवारी तालुक्यात १६७ मिलीमिटर पाऊस झाला. त्यातच देवघर प्रकल्पातून विसर्ग सुरू केल्यामुळे शिवगंगा नदीकाठच्या गावांना चांगलाच तडाखा बसला. लोरे क्रमांक १ व २ तसेच गडमठमधील अनेक घरांमध्ये महापुराचे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. पुरामुळे गडमठ पावलेवाडी येथील प्रवीण मोहिते यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या भागाला पुराच्या पाण्याने वेढले असताना सुस्त असलेल्या महसूल प्रशासनाने महसूल नायब तहसीलदार जी. आर. गावित यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळीच लोरे, गडमठमधील नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. पुलाच्या भगदाडाची लोकप्रतिनिधींनींकडून पाहणी अतिवृष्टी आणि देवघर प्रकल्पाच्या विसर्गामुळे शिवगंगा नदीला आलेल्या महापुराने वैभववाडी-फोंडा मार्गावरील लोरेतील पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे शनिवार दुपारपासूनच या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांच्यासमवेत पुलाच्या भडदाडाची पाहणी करून दुरुस्तीची तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना व्हटकर यांना दिल्या. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, माजी तालुका प्रमुख मंगेश लोके उपस्थित होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी अतुल रावराणे, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, सभापती शुभांगी पवार, तुळशीदास रावराणे यांनी भगदाडाची पाहणी केली. भगदाडाची दुरुस्ती; तरीही धोकादायकच : प्रशासन शिवगंगा नदीवरील पुलाला पडलेल्या भगदाडात नदीतील दगड आणि वाळू टाकून दिलीप रावराणे यांनी भगदाडाची तात्पुरती दुरुस्ती केली. त्यामुळे छोट्या वाहनांची दुपारपासून वाहतूक सुरू झाली आहे. परंतु, भगदाड पडलेल्या जागेची स्थिती लक्षात घेता तात्पुरत्या दुरुस्तीवर विसंबून या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूल वाहतुकीस योग्य असा अहवाल येईपर्यंत शिवगंगा नदीच्या पुलावरून वाहतूक करू नये, असे आवाहन तहसीलदार संतोष जाधव व पोलिस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांनी केले आहे. दरम्यान, वैभववाडी-फोंडा मार्गावरील एसटी वाहतूक तळेरेमार्गे वळविण्यात आली आहे.