शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्री जोरात, राज्यभरात नशामुक्ती प्रबोधनाचे कार्यक्रम ठप्प 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 24, 2024 18:57 IST

केवळ नशाबंदी मंडळ राबविते उपक्रम

सिंधुदुर्ग : दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अनेक कुटुंबे दारूमुळे उघड्यावर आली आहेत. त्यामुळे शासनाकडून नशामुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमार्फत वर्षातून किमान तीनवेळा प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जातात. पण कोरोनानंतर मागील तीन वर्षांपासून याबाबत शासनाने उदासीनता दाखविली असून नशामुक्ती कार्यक्रमासाठी अनुदान दिलेले नाही. त्यामुळे राज्यभरातच नशामुक्तीसंदर्भात जाणीवजागृती प्रबोधनाचे कार्यक्रम ठप्प झाले आहेत.

पथनाट्यातून जागरशासनाकडून नशामुक्तीसंदर्भात तंबाखूमुक्त दिन, आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिन, महात्मा गांधी जयंती सप्ताहात दारूबंदीवर विशेष भर दिला जातो. यामध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय, प्रमुख चौक, गावोगावी भारूड, कीर्तन, पथनाट्य, प्रवचन, पोस्टर या कार्यक्रमातून उपक्रम घेतले जातात. यासाठी संबंधित संस्थांना १० ते २० हजारांचे अनुदान दिले जाते. तेही मागील तीन वर्षांपासून प्राप्त झालेेले नाही.

तीन वर्षांपासून कीर्तन बंदसामाजिक प्रबाेधन व्हावे या उद्देशाने आपल्याकडे अनेक वर्षांपासून कीर्तन, प्रवचनाची परंपरा आहे. राज्य शासनाने नशामुक्ती मंच स्थापन केला आहे. परंतु या मंचद्वारे सध्या गेल्या तीन वर्षांपासून प्रबोधनच बंद असल्याचे दिसून येत आहे.

कीर्तनकाराला मानधन किती?शासनातर्फे ठिकठिकाणी प्रबोधनासाठी तयार करण्यात आलेल्या कीर्तनकारांना साधारण एका कार्यक्रमासाठी दोन ते चार हजार रुपये मानधन दिले जाते.

सामाजिक उपक्रमशासनाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवत नागरिकांसाठी जास्तीत जास्त महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. परंतु त्याचा उपयोग शेवटच्या नागरिकापर्यंत किती मोठ्या प्रमाणात केला जातो, हा एक वेगळा भाग आहे. असे असले तरी पुरातन काळापासून सुरू असलेली कीर्तन, प्रवचने अजूनही ग्रामीण भागात मोठ्या संख्येने केली जातात, त्यामुळे त्यांचा प्रचार अन् प्रसार मोठ्या प्रमाणात होत असतो. काही भागात तर वासुदेवांकडूनही प्रचार केला जातो. त्यांच्याकडून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते, त्याचे फायदे नागरिकांना सांगितले जातात.

केवळ नशाबंदी मंडळ राबविते उपक्रमराज्य सरकारने नशाबंदी मंडळाचे अनुदान दिलेले नाही. तरी नशाबंदी मंडळाचे सभासद स्वखर्चातून विविध कार्यक्रम राबवित आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याला सलामच ठोकला पाहिजे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग