शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कार्याचा दीप देतोय शेकडो महिलांना प्रकाश

By admin | Updated: October 13, 2015 23:52 IST

विद्या दिवाण : त्यांचा आधारस्तंभ पीडितांसाठी...नारीशक्तीला सलाम

शिवाजी गोरे - दापोली--कुटुंबातच समाजसेवेचे बाळकडू मिळालेल्या डॉ. विद्या दिवाण अनेक महिलांना आधारस्तंभ वाटू लागल्या आहेत. कौटुंबीक हिंसाचाराला बळी पडलेल्या साडचारशे महिलांना आधार देण्याचे काम त्यांनी गेल्या पाच वर्षात केले आहे. कौटुंबीक अत्याचार, लैंगिक अत्याचार, नवऱ्याने सोडून दिलेल्या, कुमारी माता अशा अनेक महिलांना आधार देण्याचे काम सतत त्यांच्याकडून घडत आहे.महिला हिंसाचाराचा बळी पडतात तेव्हा कुणाच्या तरी मदतीची गरज असते. परंतु अशा वेळीच समाज त्यांना नाकारतो व कुटुंबाच्या मदतीची गरज असते. परंतु त्यावेळी समाजाच्या भीतीपोटी कुटुंबातील व्यक्तीसुद्धा त्यांना घराची दारे बंद करतात. अशावेळी जीवन संपवणे हाच पर्याय डोळ्यासमोर ठेवून काही महिला आत्महत्येचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा महिलांना जीवन जगण्यास प्रवृत्त करुन त्यांना समाजापुढे सन्मानाने जगण्यासाठी उमेद जागवण्याचे कामसुद्धा त्या करीत आहेत. अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक महिला आत्महत्या करण्याच्या विचारात होत्या. त्यातून त्यांची सुटका करण्याचे काम डॉ. विद्या दिवाण यांनी केले आहे.डॉ. दिवाण ह्या दापोलीतील एक प्रथितयश डॉक्टर आहेत. माहेरचं सहस्त्रबुद्धे नाव बदलत १९८५ साली डॉ. गौतम यांच्याशी विवाह करुन त्या डॉ. विद्या दिवाण झाल्या. तेव्हापासून गेली ३० वर्षे त्या दापोली येथे वैद्यकीय व्यवसायात आहेत. बालपण सुखी आणि समृद्ध असल्याने विनासायास त्या पोद्दार मेडिकल कॉलेजमधून बी. ए. एम. एस. झाल्या. व्यवसाय व संसार ह्या दोन पातळ्यांवरची त्यांची कसरत सुरु झाली. पती डॉ. गौतम दिवाण यांच्या सक्रिय सहकार्याने ही कसरत सुलभ झाली.व्यवसायात असताना महिला रुग्णांशी त्यांची जवळीक वाढली. शारीरिक व्याधींबरोबरच ह्या महिलांच्या मानसिक अनारोग्याची, त्यांच्या व्यथांची त्यांना जवळून ओळख झाली. ह्या सर्वांसाठी काहीतरी ठोस कार्य करायला हवे, याची त्यांना तीव्रतेने जाणीव झाली. समविचारी सहकारी मैत्रिणींच्या एका गटाने एकत्र येऊन २००८ साली ‘सखी समुपदेशन केंद्रा’ची स्थापना केली. स्वत: डॉ. विद्या ह्या केंद्राच्या अध्यक्ष आहेत. गेली सात वर्षे अविरतपणे ह्या केंद्राचे काम चालू आहे. एखाद्या लहानशा कोपऱ्यात संथ पण सतत तेवणाऱ्या पणतीप्रमाणे!गेल्या सात वर्षात सुमारे साडेचारशे केसेस ‘सखी’कडे आल्या. त्यात प्रामुख्याने भरणा होता कौटुंबीक हिंसाचार, लैंगिक हिंसाचार, छेडछाड, मुलांचा ताबा, नवऱ्याने न नांदवणे, कुमारी माता अशा केसेसचा. प्राथमिक पातळीवरील समुपदेशन, पोलीस यंत्रणेकडे जाण्यासाठी मार्गदर्शन, आवश्यक असेल तेथे कौटुंबीक हिंसाचारविरोधी कायद्याची मदत घेण्याविषयी मार्गदर्शन, कायदेविषयक मोफत सल्ला, पुनर्वसनासाठी मदत, व्यसन मुक्ती केंद्रापर्यंत पोहोचण्यास मदत, सर्व केसेसचा पाठपुरावा अशा अनेक पातळ्यांवर सखीच्या कार्यकर्त्या पूर्ण क्षमतेने कार्य करीत आहेत. ह्या कार्यकर्त्या ‘दापोली तालुका महिला दक्षता समिती’मध्येही सहभागी आहेत.‘सखी’चा मानसकायदेविषयी शिक्षणदापोली तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांचे ‘आधार गट’ सखीने स्थापन केले आहेत. वाडी आणि गाव पातळीवर महिलांना ताबडतोब मदत मिळावी, ह्या उद्देशाने हे आधारगट कार्य करीत आहेत. ह्या आधार गटांना कायदेविषयक शिक्षण देण्याचा सखी केंद्राचा मानस आहे.महिलांसाठी ‘सखी’ हे व्यासपीठ म्हणून उपयोगात आणल्यावर, वैयक्तीक केसेस सोडवण्याच्या प्रयत्नांबरोबर जनजागृतीचा कार्यक्रम सखीने हाती घेतला. यानिमित्त एका परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत एका मुलीवर कुटुंब मर्यादित ठेवणाऱ्या जोडप्यांचा सत्कार केला. दापोली शहरात मोठी रॅली काढून ‘लेक वाचवा’ संदेश लोकांपर्यंत पोहोचवला.त्यांच्या सेवाकार्याची दखल दापोलीच्या सुजाण नागरिकांनी वेळोवेळी त्यांना पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन घेतली आहे. २००९मध्ये आदर्श ग्रुपतर्फे ‘आदर्श डॉक्टर’ म्हणून मिळालेले सन्मानचिन्ह, निर्मल ग्रामपंचायत ताडीलतर्फे सन्मानचिन्ह आणि २०१४ मध्ये फ्रेंडशिपतर्फे मिळालेला सखी सन्मान यांचा त्यात समावेश आहे. वेळोवेळी मदतीला धावून येण्यात दिवाण यांचा मोठा वाटा आहे.कार्याची पोचपावतीदापोलीत ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागाने खताची निर्मिती करण्याचा सखीचा मानस आहे.