शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

तीस वर्षात ९० हजारांना मिळाले जीवनदान

By admin | Updated: May 8, 2015 00:08 IST

रूग्णांंसाठी दिलासा : इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कार्य पोहोचले कोकणापर्यंत --जागतिक रेड क्रॉस दिन

शोभना कांबळे-रत्नागिरी -युद्धात जखमी होणारे सैनिक, आपद्ग्रस्त यांना मदत करण्याच्या गरजेतून रेडक्रॉस संस्थेची स्थापना करण्यात आली. रत्नागिरीतील माजी न्यायमूर्ती व्ही. ए. देसाई यांनी रेडक्रॉस सोसायटीची संकल्पना मांडली आणि मग रत्नागिरीचे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. श्रीधर सामंत, आय. वाय. सोलकर, अ‍ॅड. दिलीप भावे, अब्दुल कादीर पाटणकर, विलास करमरकर, डॉ. वीणा सामंत, डॉ. राजू शेरे आदींनी या संकल्पनेचे स्वागत करत १०८१ मध्ये रत्नागिरीत इंडियन रेड क्रॉस सोसायटीची शाखा स्थापन केली. डॉ. सामंत यांच्या हॉस्पिटलच्या एका छोट्याशा जागेत रेडक्रॉस सोसायटीचे कामकाज सुरू झाले. सोसायटीची स्थापना झाल्यानंतर थोड्याच दिवसात कार्य सुरू झाले. आश्रमशाळा तसेच इतर शाळांतील गरजू मुलांना टूथपेस्ट, पावडर, बिस्कीटे यांचे वाटप करण्यास सोसायटीने प्रारंभ केला. शाळा - शाळांमधून आरोग्य तपासणी करून आवश्यक त्या मुलांना मोफत औषधेही पुरविली. १९८४ च्या सुमारास जिल्ह्यात माखजन, चांदेराई, हरचेरी आदी भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. यावेळी रेडक्रॉस सोसायटीने आपद्ग्रस्तांना मदतीचा हात देत भांडी, ब्लँकेट, कपडे यांचे वाटप केले. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी जिल्ह्यात एकमेव शासकीय रूग्णवाहिका तसेच शववाहिका होती. त्यामुळे सामान्य रूग्णांची गरज लक्षात घेऊन सोसायटीने वाहन विकत घेऊन जिल्ह्यात रूग्णवाहिका तसेच शववाहिका उपलब्ध करून दिली. सोसायटीने ना नफा ना तोटा या तत्त्वाने ही सेवा १२ वर्षे रूग्णांसाठी अत्यल्प उपलब्ध करून दिली होती. गरिबांना ही रूग्णवाहिका सुविधा मिळाल्याने दिलासा मिळाला होता. काही वेळा तर ज्यांच्याकडून पैसे नाहीत, अशांसाठी कुठलाही विचार न करता सोसायटी अगदी मोफत ही सुविधा उपलब्ध करून देत असे. सोसायटीचे हे कार्य वेगाने सुरू झाले. त्यानंतर आधुनिक शहरीकरणाबरोबरच लोकसंख्या वाढू लागली. त्याबरोबरच अपघातांची संख्या वाढली. आजारांचेही स्वरूप बदलले. अशावेळी अपघातात जखमी होऊन किंवा विविध जीवघेण्या आजाराने बेजार झालेल्या, भाजलेल्या रूग्णांसाठी वेळेवर रक्त मिळणे म्हणजे त्या रूग्णाचा पुनर्जन्मच जणू. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न असले तरी रक्त मिळेपर्यंत बरेचदा त्या रूग्णाच्या जीवनमृत्युचा लढा सुरू असे. रक्ताची गरज भागवण्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाची सुविधा म्हणजे रक्तपेढी रत्नागिरीत नसल्याने रूग्णाला अत्यवस्थ स्थितीत पुणे, मुंबई किंवा कोल्हापूर येथे हलवावे लागे. तेथे तातडीने रक्त मागवावे लागे. यासाठी येणाऱ्या तांत्रिक, आर्थिक अडचणीमुळे बरेचदा रूग्ण दगावण्याच्या घटना घडत असत. ही महत्त्वाची गैरसौय लक्षात घेऊन येथील रेडक्रॉस सोसायटीने २४ फेब्रुवारी १९८३ मध्ये ‘रेडक्रॉस ब्लड बँके’ची सुरूवात केली. ही रक्तपेढीही डॉ. सामंत यांच्याच जागेत सुरू झाली. कालांतराने तत्कालीन नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांच्या सहकार्याने सोसायटीला जागा मिळाली आणि २००० साली या नव्या जागेत इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या ब्लड बँकेची इमारत उभी राहिली. या ब्लड बँकेमुळे आतापर्यंत खेड ते सावंतवाडीपर्यंतच्या ९० हजार रूग्णाना रक्तपुरवठा करून त्यांना जीवनदान मिळवून त्यांच्या कुटुंबात आनंदाची पहाट निर्माण केली आहे. गेल्या वर्षीपासून रक्तातील प्रमुख तीन घटकांचे विघटन करणारे युनिटही सोसायटीने सुरू करून रूग्णांना दिलासा दिला आहे.रक्तविघटन केंद्राची गरज लक्षात घेऊन रेडक्रॉस सोसायटीने गेल्या वर्षीपासून ३५ लाख रूपयांची गुंतवणूक करून सोसायटीच्या जागेत रक्त विघटन केंद्र सुरू केले आहे. या केंद्रासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक मशिनरी तसेच आवश्यक ते प्रशिक्षित तंत्रज्ञ सोसायटीने नेमले आहेत. यामुळे जनतेची सोय झाली आहे. त्यामुळे आता या सुविधेसाठी जिल्ह्याबाहेर न जाता तत्काळ आवश्यक घटक आता रत्नागिरीतच मिळत आहेत.33रक्तविघटन केंद्राची गरज लक्षात घेऊन रेडक्रॉस सोसायटीने गेल्या वर्षीपासून ३५ लाख रूपयांची गुंतवणूक करून सोसायटीच्या जागेत रक्त विघटन केंद्र सुरू केले आहे. या केंद्रासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक मशिनरी तसेच आवश्यक ते प्रशिक्षित तंत्रज्ञ सोसायटीने नेमले आहेत. यामुळे जनतेची सोय झाली आहे. त्यामुळे आता या सुविधेसाठी जिल्ह्याबाहेर न जाता तत्काळ आवश्यक घटक आता रत्नागिरीतच मिळत आहेत.रेडक्रॉस सोसायटीच्या रक्त विघटन केंद्रात मूळ रक्तातील प्लेटलेट, तांबड्या पेशी (पी. सी. व्ही.), पांढऱ्या पेशी आणि प्लाझ्मा या प्रमुख तीन घटकांचे विघटन केले जाते. रूग्णाला आवश्यक असे घटक आता या केंद्रामुळे तत्काळ उपलब्ध होऊ लागले आहेत. गरजू लोकांना यामुळे आता दिलासा मिळाला आहे.रत्नागिरीतील रेडक्रॉस सोसायटीतर्फे दरवर्षी २५ ते ३० शिबिरे आयोजित केली जातात. काही वेळा, सामाजिक संस्था, राजकीय व्यक्ती, महाविद्यालये यांच्या रक्तदान शिबिरातूनही ब्लड बँकेसाठी रक्त संकलन होते. या सर्वांच्या माध्यमातून साधारणत: २००० बाटल्या रक्त संकलन केले जाते. यापैकी काही बाटल्या ३५० मिलीच्या, तर काही ४५० मिलिलीटरच्या असतात. रक्तदात्याकडून रक्त घेतल्यानंतर प्रत्येक युनिटवर त्यावर प्रक्रिया करावी लागते. पूर्ण रक्त घेतल्यानंतर ते ३५ दिवसांपर्यंतच वापरता येते. त्यानंतर मात्र, त्याची बायोमेडिकल पद्धतीने विल्हेवाट लावावी लागते. त्यामुळे वर्षभराची गरज लक्षात घेऊनच सोसायटीला वर्षभरात शिबिरांचे आयोजन करून रक्त संकलित करावे लागते.वाहनांची संख्या वाढल्यो अपघातात सातत्याने वाढ होत आहे. साहजिकच रक्ताची मागणीही वाढू लागली आहे. त्यातच थॅलसेमिया, ब्लड प्लॉटिंग डिसआॅर्डर, हिमोफलिया आदी रूग्णांना सातत्याने रक्ताची गरज लागते. जिल्ह्यात या आजारांनी त्रस्त असलेले साधारणत: दहा रूग्ण आहेत. मानवतावादी दृष्टीकोनातून या रूग्णांना रेडक्रॉसच्या रक्तपेढीतून मोफत रक्त पुरवठा केला जातो. ज्यांना रक्त देता येत नाही. मात्र, त्यांना या उदात्त कार्याला हातभार लावावा, अशी इच्छा असते, अशांसाठी सोसायटीने एक वेगळी योजना सुरू केली आहे. त्या व्यक्तीकडून १० हजार रूपयांची देणगी स्वीकारून दरवर्षी त्या व्यक्तीच्या नावे गरजू रूग्णाला मोफत रक्त पुरविले जाते. अर्थात याबाबत त्या व्यक्तीला कळविले जातेच पण रक्त घेणाऱ्याकडूनही त्याला कृतज्ञतेचे पत्र पाठविले जाते.1रक्तविघटन केंद्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत या युनिटचा ८०० रूग्णांना आधार मिळाला आहे. या केंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या आठ मशिनरीसाठी लागणारा निधी सोसायटीने बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतला आहे. त्यासाठी सध्या चार विशेष प्रशिक्षण असलेले तंत्रज्ञ या युनिटमध्ये कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार मशिनरीची देखभाल, दुरूस्ती यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च सोसायटीला उचलावा लागत आहे. 2अतिशय गरीब असणाऱ्या लोकांना कित्येक वेळा या ब्लडबँकेने अल्प खर्चात नव्हे तर अगदी मोफतही रक्तपुरवठा केला आहे. सोसायटीच्या कार्याचा वाढता आवाका असल्याने सोसायटीला आर्थिक हातभाराची मोठी गरज भासत आहे. अर्थात या देणगीदात्यांना आयकरातून सवलतही मिळणार आहे. 3रत्नागिरी इंडियन रेडक्रॉस सोसायटीने आपल्या जनसेवेप्रती बांधिलकी जपत स्थापनेपासून आतापर्यंत खेड ते सावंतवाडीपर्यंतच्या ९० हजार रूग्णांना रक्तपुरवठा करून त्यांना जीवनदान देण्यास मदत केली आहे. 4अपघातात रक्तस्त्राव झालेली, जीवघेण्या आजाराने बेजार झालेली, आगीत होरपळलेली, रक्ताअभावी तडफडणाऱ्या रूग्णांकरिता तत्काळ विविध गटाचे रक्त वा त्यातील रक्तघटक उपलब्ध करून त्या रूग्णांचे जीव वाचविणारी ही ब्लडबँक त्या रूग्णांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांकरिता देवदूत ठरत आहे. 5सामाजिक कार्यात माणूसकीच्या दृष्टीकोनातून आतापर्यंत कार्य करत आलेल्या रेडक्रॉस सोसायटीच्या या कार्याची दखल राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली आहे. या संस्थेच्या कार्याचा गौरव करून राष्ट्रीय पातळीवर तीन वेळा मेरिअ सर्टिफिकेट आणि राजा महाराजा ट्रॉफी प्रदान करून या सोसायटीचा गौरव केला आहे. सोसायटीला हे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी अजूनही मदतीचा हात पुढे करणाऱ्या, मानवतावादी दृष्टीकोन असलेल्या, कर्तव्याला वाहून घेतलेल्या समाजातील अनेक व्यक्तींच्या सहकार्याची नितांत गरज आहे.रेडक्रॉस सोसायटीचे जनक म्हणजे जिनेव्हाचे जीन हेन्री डुनांट. राष्ट्रा- राष्ट्रांतर्गत होणाऱ्या युद्धात यात जखमी झालेल्या सैनिकांवर मानवतावादी दृष्टीकोनातून उपचार करणारी, त्यांना मदत करणारी एखादी व्यापक अशी संस्था असायला हवी. या संकल्पनेतून डुनांट यांनी १८६४ मध्ये जागतिक रेडक्रॉस सोसायटीची स्थापना केली. त्यांचा जन्मदिन ८ मे. म्हणून जागतिक स्तरावर रेडक्रॉस दिन ८ मे रोजी साजरा होतो. पहिल्या महायुद्धानंतर भारतातही अशा मानवतावादी दृष्टीकोनातून कार्य करणाऱ्या संस्थेची गरज भासू लागली आणि ७ जून १९२० रोजी सर माल्कम हेले यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन रेडक्रॉस सोसाटीची स्थापना झाली.