शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : लाईफ टाईमला शासकीय योजना : दीपक केसरकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 15:02 IST

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या लाईफ टाईम रुग्णालयाबाबत मी कोणतेही चुकीचे विधान केले नसून, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असा खुलासा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुडाळ येथील महिला व बालकल्याण रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या पाहणीदरम्यान केला.

ठळक मुद्देलाईफ टाईमला शासकीय योजना : दीपक केसरकर यांची माहिती रुग्णालयाबाबत चुकीचे विधान केले नसल्याचे स्पष्ट

कुडाळ : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या लाईफ टाईम रुग्णालयाबाबत मी कोणतेही चुकीचे विधान केले नसून, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असा खुलासा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुडाळ येथील महिला व बालकल्याण रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या पाहणीदरम्यान केला. राणे यांच्या रुग्णालयाला लवकरच भेट देणार असून तेथेही शासकीय योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुडाळ येथे शासनाच्यावतीने जिल्ह्यासाठी नव्याने विशेष महिला व बाल रुग्णालय होणार असून, या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतीची पाहणी पालकमंत्री केसरकर यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, सभापती राजन जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक आदी उपस्थित होते. केसरकर यांनी सांगितले की, महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

येत्या तीन महिन्यांत सर्व काम पूर्ण होणार आहे. रुग्णालय लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, याठिकाणी शासकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे.विधानाचा विपर्यासनारायण राणे यांनी पडवे येथे सुरू केलेल्या रुग्णालयाच्या बाबतीत माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मी तसे काहीही बोललो नव्हतो. मी त्यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा दिल्या होत्या. लवकरच या रुग्णालयात शासकीय योजना सुरू होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर