शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध करण्याचा संकल्प करूया, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन 

By सुधीर राणे | Updated: February 12, 2024 17:18 IST

'भास्कर जाधव हे कृतघ्न'

कणकवली: जनता हीच माझी संपत्ती आहे. हीच माझी लक्ष्मी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिक दृष्ट्या समृद्ध करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ही मोहीम हाती घेवून काम करूया. नवनवीन रोजगार, उद्योग उभे करण्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी तुमची मला साथ आणि मार्गदर्शनही हवे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा  समृद्ध व्हावा यासाठी संकल्प करून पुढे चालूया, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.कणकवली येथे 'विकसित समृद्ध सिंधुदुर्ग जिल्हा व भारत'  या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, डॉ. प्रसाद देवधर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, भालचंद्र मराठे अशोक करंबेळकर, प्रज्ञा ढवण, नामदेव जाधव, मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री आदि मान्यवर उपस्थित होते.मंत्री राणे म्हणाले, चांगल्या मार्गाने पैसे मिळविण्यास लाज बाळगू नका. जीवनात ज्याने प्रगती येते त्या गोष्टी आत्मसात करा. गरीबीवर मात कशी करायची यावर बोलून मी थकलो आहे. मी राजकारणी असलो तरी प्रथमतः उद्योजक आहे.मी जपान, जर्मनी मध्ये मासे निर्यात करतो. हॉटेल इंडस्ट्रीत मी काम करतो आहे. मात्र इतर मच्छिमारांना माझ्यासारखा व्यवसाय करा म्हणून सगळी व्यवस्था करून दिली तरीही आपले लोक ती कामे करत नाहीत. मी आता गो शाळा बांधत आहे. शेळी, मेंढी आणि पोलट्री फार्म करतो आहे. शेण, गोमूत्र यापासून रंग बनविला जाणार आहे.  घर चालविण्यात एक गाय खूप मदत करू शकते. तुम्ही सुद्धा करावा असा हा उद्योग आहे. जिल्हातील लोक अशा गोष्टींना प्राधान्य देत नाहीत. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भास्कर जाधव हे कृतघ्न !भास्कर जाधव यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मी नेले होते. त्यांना उमेदवारी दिली. १५ लाख निवडणुकीसाठी खर्चासाठी दिले. मात्र तो माणूस कृतघ्न निघाला. तो माझ्या बद्दल बोलतो तेव्हा वाईट वाटते. किमान उपकार तरी विसरू नयेत. असे मंत्री नारायण राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे