शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसह कणकवली विधानसभा मतदारसंघात विजय आमचाच, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने केला दावा

By सुधीर राणे | Updated: September 26, 2023 17:13 IST

कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करणारे 'होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न' या अभियानाचे ...

कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करणारे 'होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न' या अभियानाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात केले आहे. ऑक्टोबर महिन्यात १ ते १२ ऑक्टोबर पर्यंत या विशेष अभियानाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती या अभियानाचे निरीक्षक व शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांनी दिली. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा कोणीही करू देत. या लोकसभेसह कणकवली विधानसभा मतदारसंघात देखील विजय आमचाच होणार असा दावा खोत यांनी केला. कणकवली येथील विजय भवन मध्ये मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर आदी उपस्थित होते.  खोत म्हणाले, काळा पैसा भारतात आणणे, परदेशात पैसा घेऊन पळालेल्या काहींना भारतात परत आणणे यासह आधार लिंक करा, बँकेत पैसे जमा होतील, पॅन कार्ड लिंक करा, मग अनुदान जमा होईल अशी अनेक कामे करायला लावत जनतेच्या तोंडाला भाजप सरकारने पाने पुसली आहेत. याचा जाब विचारला जाणार असून या अभियानाच्या माध्यमातून गाव, वाडी वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती केली जाणार आहे. तसेच फसवणूक करणाऱ्या लोकांना परत तुम्ही निवडून देणार आहात का? असा देखील प्रश्न विचारला जाणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे प्राबल्य आहे. त्यामुळे लोकसभेसह कणकवली विधानसभा मतदार संघावर देखील आम्ही विजय मिळवणार आहोत. असा दावा त्यांनी केला. मात्र, कणकवली मतदार संघात उमेदवार कोण? या प्रश्नाला त्यांनी उत्तर देणे टाळत पक्षप्रमुख त्याबाबत निर्णय घेतील असे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण