शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

जिल्ह्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेवू

By admin | Updated: January 29, 2015 23:29 IST

विनायक राऊत : मसुरे येथे शिवसेनेच्या खासदार, आमदारांचा सत्कार

चौके : आदर्श विकासासाठी लोकसहभागाची गरज असते. त्यानुसारच लोकसहभागातून राजकारणविरहीत कोकण विकासाचा नवा राज्यमार्ग उभारला जाईल. जिल्ह्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेवून ठेवले जाईल. शिवसेनेच्या माध्यमातून सत्ताधारी म्हणून काम करताना आमचे आमदार, खासदार, मंत्री, भुमिपुत्र म्हणून विकासाला प्राधान्य देतील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी मसुरे येथे बोलताना व्यक्त केला.समर्थ सहकारी पतपेढी मुंबई शाखा मसुरे मर्ढेवाडी व माता काशीबाई महादेव परब चॅरिटेबल ट्रस्ट मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात आयोजित या सत्कार सोहळ्यास संस्थापक जयवंत परब, सचिव बाबाजी भोगले, मनोहर नाईक, प्रकाश परब व अन्य संचालक, स्कूल कमिटी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभूगावकर, सरपंच गायत्री ठाकूर, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, नंदू गवंडी, माजी शिक्षिका कल्याणी कांबळी, मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे व स्कूल कमिटी सदस्य, शिक्षक, पालक, कर्मचारी, ग्रामस्थ व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी मसुरे गावात अनेक अडचणींना सामना करत संस्थापक जयवंत परब यांनी उभारलेली ही इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे एक शिवधनुष्य असल्याचे सांगत शाळेचे व सर्व शिक्षकवर्गाचे कौतुक केले तर शाळेसाठी खासदार निधीतून १० लाखांचा निधी देण्याचे जाहिर केले. यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी जनतेची सेवा करताना विकासालाच प्राधान्य देणार असल्याचे सांगत जयवंत परब यांच्या ४० वर्षांच्या कामाचे कौतुक केले.जयवंत परब म्हणाले की, माझ्या मसुरे गावाचा विकास हेच माझे ध्येय आहे. इंग्रजी ही काळाची गरज ओळखून मसुरेत शाळा सुरु केली. जेणेकरून माझ्या मसुरेतील मुलांनी दर्जेदार शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचावे. मसुरे गड आणि अन्य नदीतील गाळ उपसा, बांदिवडे पूल पूर्ती, मसुरेचा पर्यटन विकास यालाही प्राधान्य देण्याची गरज बोलून दाखवली. तसेच काँग्रेसच्या संग्राम प्रभुगांवकर यांनाही शिवसेनेत येण्याचे आमंत्रण त्यांनी यावेळी दिले.यावर संग्राम प्रभुगांवकर यांनी गावच्या रखडलेल्या समस्या मार्गी लावण्याची मागणी करत मागील काही वर्षात आम्ही विकासाचा पाया घातला. तुम्ही आता कळस चढवा असा मार्मिक टोला यावेळी लगावला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबाजी भोगले यांनी केले तर संग्राम प्रभुगांवकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)