शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या बछड्याचा छळ केला नाही, त्या ग्रामस्थांच्या पाठीशी गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 22:04 IST

सातार्डा येथील बिबट्याच्या बछड्याला पकडून त्याचा छळ केल्या प्रकरणाचा गुन्हा वनविभागाने दाखल केला असतानाच आता सातार्डा येथील ग्रामस्थ ही चांगलेच आक्रमक झाले आहे.

सावंतवाडी : सातार्डा येथील बिबट्याच्या बछड्याला पकडून त्याचा छळ केल्या प्रकरणाचा गुन्हा वनविभागाने दाखल केला असतानाच आता सातार्डा येथील ग्रामस्थ ही चांगलेच आक्रमक झाले आहे. गेले काही महिने बिबट्याकडून आमच्या कोंबड्या कुत्र्यावर हल्ला झाला तेव्हा पर्यावरण प्रेमी कुठे होते. असा सवाल करत ग्रामस्थांवर कारवाई करून दाखवावीच असे आवाहन सातार्ड्याचे माजी सरपंच उदय पारिपत्ये यांनी दिले आहे. बिबट्याच्या बछड्याचा छळ केला नव्हता तर त्याला सुरक्षित स्थळी ठेवण्यात येत होते. हा त्याचा गुन्हा आहे का?, असा प्रश्न ही ते उपस्थित करत आहेत.सातार्डा येथील अंगणात आलेल्या बिबट्याच्या बछड्याचा ग्रामस्थांनी छळ केल्याचा आरोप करत व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओवरून वनविभागाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच याबाबत चौकशी समिती ही नेमण्यात आली आहे. मात्र सातार्डा गावात बिबट्याच्या बछड्याचा छळ केला नसून त्या बछड्याला उलट आम्ही सुरक्षित स्थळी घेऊन गेलो. तसेच त्याला वनविभागाच्या ताब्यात दिले आहे, असे खुलासा स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.जर पर्यावरण प्रेमींना आम्ही या बिबट्याच्या बछड्याचा छळ केला, असे वाटत असेल तर आतापर्यंत सातार्ड्यातील ती पाच ते सहा घरे बिबट्याच्या दहशतीखाली कशी वावरत होती. ते बघावे बिबट्याने आतापर्यंत कुत्र्यावर तसेच कोंबड्यावर हल्ले केले होते. तो कधी ही घरामध्ये ही शिरू शकला असता मग पुढे होणारी हानी कोण भरून काढणार होते, असा सवाल ही ग्रामस्थांनी केला आहे. सातार्ड्याचे माजी सरपंच उदय पारिपत्ये यांनी आम्ही पूर्ण गाव सातार्डा येथील त्या ग्रामस्थांच्या बाजूने आहे.जर कोणाला वाटत असेल ग्रामस्थांनी छळ केला असे तर त्यांच्याशी चर्चा करावी त्यातून सत्य बाहेर येईल, बिबट्याच्या बछड्याचा कोणी ही छळ केला नाही. उलट या बछड्याला सुरक्षित स्थळी हलवून तो वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यानंतर वनविभागाने त्याच्यावर उपचार करून जंगलात सोडले आहे. वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. पण यांची सखोल चौकशी करावी नंतरच कारवाईची भाषा करावी आम्ही ग्रामस्थ पूर्णपणे त्या ग्रामस्थांच्या बाजूने असल्याचे ही यावेळी पारिपत्ये यांनी स्पष्ट केले.