शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

अखेर घडलंच...

By admin | Updated: October 30, 2015 23:24 IST

आणखी एक मासा लाचलुचपतच्या जाळ्यात

ज्योतिप्रसाद सावंत --आजरा--शासकीय कामे करून घ्यायची म्हणजे संबंधित कर्मचारी अथवा अधिकारी यांच्या उपकाराखाली राहायचे, अशीच कांहीशी भावना सर्वसामान्य नागरिकांकडून होत असल्याने ‘खुशाली’च्या नावाखाली पदाचा गैरवापर करीत राजरोजपणे लुटण्याचा अतिरेक झाला की, लाचलुचपतच्या जाळ्यात अडकण्यात फारसा वेळ लागत नाही, हे आजरा येथील नुकत्याच झालेल्या भूमी अभिलेखमधील प्रकरणाने अधोरेखित झाले आहे.वास्तविक महसूल विभाग अशा प्रकरणात आघाडीवर असता; परंतु महसूलबरोबर पोलीस, पोलीसपाटील, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग येथेही असे प्रकार घडले आहेत. इतरत्रही घडतच असतात; पण आजरेकरांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांचा यातून मुजोरपणा वाढतो. भरमसाठ मागण्या होऊ लागतात. सहनशीलता संपली की, मग शेवटचा आधार लाचलुचपत खाते राहते. सोमवार ते गुरुवार याच कामात वाडकर गुंतलेला असायचा. शुक्रवारी मुख्य अधिकारी आले की, सहीसाठी कागद सरकवायचे आणि अधिकाऱ्यांच्या नावावार पक्षकारांकडून वसुली करण्याची हा प्रकार अखेर महागात पडला आहे. यामुळे आणखी एक खाते बदनाम झाले आहे हे नक्की.याचा परिणाम म्हणजे कामांसाठी पक्षकारांना खेटे मारावे लागतात. ‘स्थावर’ लाखोंचे व्यवहार अडकून राहिल्याने चकरा मारून वैतागलेला ‘सामान्य’ माणूस काहीतरी घ्या; पण काम करून द्या, असे साधे गणित संबंधित कर्मचाऱ्यांसमोर ठेवतो आणि आपण पगारी कर्मचारी आहोत याचे भान विसरून खुशालीचे गोंडस नाव पुढे करून दिल्या जाणाऱ्या रकमा हक्काच्या समजल्या जातात.तक्रारींचा पाऊसआजरा तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्याबाबत ‘लाचलुचपत’कडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल होत आहेत. यावरून लोकप्रतिनिधींचा शासकीय विभागावर अंकुश राहिला नाही, असेच म्हणावे लागेल. भूमी अभिलेखची तर तऱ्हाच वेगळी आहे. मुळातच या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. तालुका भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना एकाचवेळी वेगवेगळ्या तालुक्याची जबाबदारी दिल्याने हाताखालील कर्मचारी कारभाराचा गाडा हाकताना दिसतात. प्रॉपर्टी कार्ड, नकाशे तयार करणे, मोजणीची कामे, न्यायालयीन तारखांना हजर राहणे हे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शक्य होत नाही.