शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पशुधनात तब्बल ३४ हजारांनी घट

By admin | Updated: May 19, 2015 00:28 IST

१९ व्या पशुगणनेची आकडेवारी जाहीर : जिल्ह्यात १0 लाख, १३ हजार, ३७९ पशुसंख्या--लोकमत विशेष

गिरीष परब - सिंधुदुर्गनगरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०१२ला करण्यात आलेल्या १९व्या पशुगणनेची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १० लाख १३ हजार ३७९ एवढी पशुसंख्या असून २००७ ला करण्यात आलेल्या पशुगणनेच्या तुलनेत यावेळी पशुधनात तब्बल ३४ हजाराची घट झाल्याचे पशुविभागामार्फत करण्यात आलेल्या पशुगणनेच्या अहवालावरून समोर आले आहे.शासन आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुगणना ही दर पाच वर्षांनी केली जाते. १९वी पशुगणना २०१२ मध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने पशुगणना करण्यात आली होती. ही पशुगणना २०१२ मध्येच पूर्ण करून ती आकडेवारीचा अहवाल केंद्र शासनास सादर करण्यात आला होता. सर्वच राज्यांचा पशुगणनेचा अहवाल जोपर्यंत केंद्रास सादर होत नाही. तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुगणनेची आकडेवारी प्रसिद्ध न करता त्यात कमालीची गोपनियता पाळण्यात आली होती. मात्र आता देशातील १९वी पशुगणना पूर्ण झाली असून त्याची आकडेवारीही निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १० लाख १३ हजार ३७९ एवढे पशुधन असल्याचे समोर आले आहे. देशाच्या अर्थरचनेत पशुधनाचा महत्त्वाचा वाटा आहे. अर्थव्यवस्थेत पशुंचा कशाप्रकारे व कसा उपयोग होतो याची परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी पशुगणना केली जाते. यामध्ये पशुपासून दुधाचे उत्पन्न किती, मांस किती मिळते, अंडी, लोकराचे उत्पन्न किती मिळते, पशुधनाचा कशाप्रकारे शेतीत उपयोग केला जातो, याची परिपूर्ण माहिती या पशुगणनेद्वारे सरकारला मिळते. या पशुगणनेद्वारे देशात किती पशु-पक्षी आहेत व त्यांच्यात किती प्रजातींचा समावेश आहे, याचीही माहिती मिळते. पशुगणनेच्या आकडेवारीवरून पशुधनासाठी त्यांच्या उपचारासाठी किती लसींचा साठा उपलब्ध करून ठेवावा, तसेच पशुधन विकासासाठी विविध उपाययोजना राबविण्यासाठी व संशोधनासाठी हे मुख्य उद्देश डोळ््यासमोर ठेवून राज्यात दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. २००७ रोजी जी पशुगणना करण्यात आली होती त्यात पशुंची संख्या १० लाख ४७ हजार ३९७ एवढी होती. मात्र २०१२ साली करण्यात आलेल्या पशुगणनेतील आकडेवारीनुसार ती गणना १० लाख १३ हजार ३७९ एवढी झाली. त्यानुसार तब्बल ३४ हजार ८ एवढी पशुसंख्या कमी झाल्याचे सर्व्हेनुसार समोर आले आहे. पशुधनाच्या संख्येत कमालीची वाढ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग विविध योजना राबवत असताना पशुधनात झालेली घट पाहता ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.पशुधन संख्येत सिंधुदुर्ग ‘लोयेस्ट’सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुधन संख्येत वाढ होण्यास काहीच हरकत नाही. तसे त्याला पोषक वातावरणही आहे. २०१२ची जाहीर झालेली पशुगणनेची आकडेवारी पाहता अहवालातील ३४ जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुधन हे खूप कमी आहे. गायी व म्हशींची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गात खूप कमी आहे. त्यामुळे पशुधन संख्येत सिंधुदुर्गला लोयेस्टच मानावे लागेल.म्हशींची संख्या झपाट्याने घटलीसिंधुदुर्गात दुग्ध व्यवसाय तेजीत व्हावा यासाठी अनुदान तत्वावर म्हशी विकल्या जात आहेत. असे असले तरी २००७च्या पशुधनाच्या तुलनेत २०१२ मध्ये म्हशींच्या गणनेत तब्बल १४ हजार १२७ ने घट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.२००७ व २०१२ची पशुगणनेची तुलनासन २००७संख्यापशुची जातसंकरीत व देशी गाय१,७७,३६१म्हशी८१,०६२शेळ््या३०,७६१मेंढ्या०६डुकरे१,३३८कोंबड्या७,५६,८६९एकूण१०,४७,३९७सन २०१२संख्यापशुची जातसंकरीत व देशी गाय१,४७,४१०म्हशी६६,९३५घोडे१५गाढव३४शेळ््या२८,१२५मेंढ्या११डुकरे१,६९८कोंबड्या७,६९,१५१एकूण१०,१३,३७९