शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कुर्लीत बिबट्याचा घरात घुसून वृध्द दाम्पत्यांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 14:13 IST

कुर्ली येथे पाळलेल्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करणा-या वृद्ध पवार दांम्पत्यावर बिबट्याने घरात घुसुन हल्ला केला. या हल्ल्यात मोहन पवार(६०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांची पत्नी ही जखमी आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देकुर्लीत बिबट्याचा घरात घुसून वृध्द दाम्पत्यांवर हल्ला पडवीतील कुत्र्याला वाचविताना दोघं जखमी; वृद्धाची प्रकृती गंभीर

वैभववाडी(सिंधुदुर्ग): कुर्ली येथे पाळलेल्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करणा-या वृद्ध पवार दांम्पत्यावर बिबट्याने घरात घुसुन हल्ला केला. या हल्ल्यात मोहन पवार(६०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांची पत्नी ही जखमी आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.कुर्ली येथे मोहन पवार कुटुंबिय शुक्रवारी(ता.२०) रात्री जेवण आटोपून झोपले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा पाळीव कुत्रा भुकायला लागला. त्यामुळे मोहन पवार यांची पत्नी मनिषा यांनी कुत्रा का भुंकतो? म्हणून पाहीले तेव्हा घराच्या पडवीत असलेल्या कुत्र्याला बिबट्याने पकडले होते.

कुत्र्याला सोडविण्यासाठी त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी बिबट्याने कुत्र्याला सोडून मनिषा पवार यांच्यावर हल्ला केला. पत्नीला सोडविण्यासाठी मोहन पवार पुढे गेले असता बिबट्याने त्यांना लक्ष केले. परंतु त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.दरम्यान या हल्ल्यात मोहन पवार त्यांच्या पाठीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरात घुसून बिबट्याने पवार दांपत्यावर हल्ला केल्यामुळे कुर्ली गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत. तालुक्याच्या सर्वच भागात बिबट्यांचे वास्तव्य वाढले असून भक्ष्याच्या शोधात त्यांचा दिवसाढवळ्या मनुष्यवस्तीत वावर दिसू लागला आहे. कुर्लीतील थरारामुळे जनतेत भिती पसरली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याsindhudurgसिंधुदुर्ग