शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

शोषखड्डा अभियानात कुडाळ पंचायत समिती राज्यात सर्वोत्कृष्ट, राज्यपालांच्या उपस्थितीत येत्या शुक्रवारी गौरविणार

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 1, 2023 17:51 IST

सलग तीन वर्षे राज्यात अव्वल 

कुडाळ : संपूर्ण महाराष्ट्रात शोषखड्डा मोहीमेमध्ये एकमेव कुडाळ पंचायत समितीची सर्वोकृष्ट निवड झाली आहे. पंचायत समितीने पुन्हा एकदा यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये २३२९१ शोषखडयामध्ये एका कुडाळ तालुक्यात ९३१७ असे सर्वाधिक शोषखड्डे मारण्यात आले. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार ३ मार्चला मुंबई येथे होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करुन सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजनेचा शुभारंभ ३ मार्च सकाळी ११.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र विधानमंडळ, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्री, ३४ जिल्ह्यामधील उत्कृष्ट काम करणारे १२० गट विकास अधिकारी हे हजर राहणार आहे.गेल्या तीन वर्षात २०२०- २०२१, २०२१-२०२२ ,२०२२-२०२३ या वर्षात  ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हास्तरावर वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्या अधिकाधिक  संस्थांना सर्वोच्च ग्रामपंचायतना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.कोविड कालावधी असतानासुद्धा  ग्रामपंचायत तालुका व जिल्हास्तरावर वैशिष्ट्यपूर्ण काम करताना कुडाळ तालुका पंचायत समितीने गेली तीन वर्षे 'माझं घर माझा शोषखड्डा' हे अभियान राबविले होते. जिल्हा परिषद तत्कालिन अध्यक्षा संजना सावंत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित  नायर यांच्या  प्रमुख उपस्थितीत  या योजनेचा जिल्हा पातळीवरील शुभारंभ पणदूर येथे तर समारोप नेरूर या ठिकाणी  करण्यात आला होता.या वैशिष्ट्यपूर्ण स्तुत्य उपक्रमाची राज्य शासनाने दखल घेतली असून कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी  विजय चव्हाण व सहायक प्रशासन अधिकारी चंद्रशेखर माळकर यांना निमंत्रित केले आहे. त्यांचा  गौरव होणार आहे.सलग तीन वर्षे राज्यात अव्वल रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या कोकण विभागात कुडाळ पंचायत समितीने बाजी मारली आहे. यापूर्वी कुडाळ तालुक्याने सलग तीन वर्षे राज्यात अव्वल आहे. तसेच महाआवास योजनेत अव्वल स्थान प्राप्त केले होते. यामध्ये सहायक प्रशासन अधिकारी शेखर माळकर, अधीक्षक नंदकुमार धामापुरकर, शिल्पा वेंगुर्लेकर, अमित देसाई, मंदार पाटील, विजया जाधव, रुपेश चव्हाण  तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सर्व सरपंच ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळ