शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्पेस चॅलेंज स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कुलचा प्रकल्प अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 15:46 IST

अंतरिक्ष तंत्रज्ञान वापरून जंगलातील वणव्यावर नियंत्रण असा प्रकल्प या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केला होता.

कुडाळ:  नीती आयोगाने राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या स्पेस चॅलेंज २०२१ या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रकल्प अव्वल ठरला आहे.  हा प्रकल्प प्रशालेच्या विश्वजीत परीट, चैतन्या सावंत व सार्थक कदम या विद्यार्थ्यांच्या संघाने केला. संपुर्ण देशात ६ हजार ५०० प्रकल्प सादर झाले होते. निती आयोग विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करीत असते. त्यातून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. त्याच धोरणाचा एक भाग म्हणून नीती आणि मिशन आणि सी.बी.एस.सी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवर स्पेस २०१९ ही स्पर्धा आयोजित केली होती. संपूर्ण देशातून ६५०० प्रकल्प या स्पर्धेत सहभागी झाले होते. तज्ञ व्यक्तींच्या काटेकोर परीक्षणातून यातील ७५ विजय प्रकल्प घोषित करण्यात आले आहे. यामधून कुडाळ हायस्कूल, जूनियर कॉलेज मार्फत विश्वजीत परीट (इयत्ता १० वी), चैतन्या सावंत आणि सार्थक कदम (७वी) या विद्यार्थ्यांच्या संघाने या स्पर्धेत भाग घेतला होता. शाळेच्या अटल टिंकरिंग प्रयोग शाळेच्या मार्गदर्शनाखाली अंतरिक्ष तंत्रज्ञान वापरून जंगलातील वणव्यावर नियंत्रण असा प्रकल्प या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केला होता.

विश्वजीत परीट, चैतन्या सावंत आणि सार्थक कदम या तीन विद्यार्थ्यांनी 'अंतरिक्ष तंत्रज्ञान वापरून जंगलातल्या वणव्यांवर नियंत्रण' असा प्रकल्प या स्पर्धेत मांडला होता.

यासाठी प्रकल्प शिक्षक योगानंद सामंत, सुजय पाटील, देवदत्त काळगे, अटल मेंटाॅरच्या रश्मी परब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या कामाचे फलित म्हणून ७५प्रकल्पा मधुन या प्रकल्पाची विजेता प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली आहे.या यशाबद्दल कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष भाईसाहेब तळेकर, सहकार्यवाह आनंद वैद्य, सदस्य सुरेश चव्हाण, अरविंद शिरसाट, माजी मुख्याध्यापक का. आ. सामंत, मुख्याध्यापिका शालीनी शेवळे, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक दिनेश आजगावकर, महेश ठाकूर, उपमुख्याध्यापक ज्युं कॉलेज राजकिशोर हावळ, प्रकल्प शिक्षक योगानंद सामंत यांनी सर्वांचे कौतुक केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळResearchसंशोधन