शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

कुडाळला पुराचा धोका कायम

By admin | Updated: July 17, 2014 23:08 IST

आंबेडकर नगरमधील समस्या : नदीपात्रालगत बांधकामांना परवानगी ठरतेय मारक

रजनीकांत कदम - कुडाळकुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीला दरवर्षी पूर येतो. नदीचे वाढलेले पाणी ज्या परिसरात पसरते त्याठिकाणी नवीन इमारतींची बांधकामे करण्यात येत आहेत. त्यामुळे यावर्षी भंगसाळ नदीला पूर आल्यास पुराचे पाणी अन्यत्र पसरणार आहे. कुडाळ येथील बाबासाहेब आंबेडकर नगर येथील दहा ते बारा घरांना या पुराच्या पाण्याने काही दिवसांपूर्वी वेढा दिला होता. मात्र, पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने कोणतेही अघटीत घडले नाही. परंतु, पुन्हा रात्री अपरात्री पूर आल्यास ही घरे पाण्याखाली जाण्याचा धोका कायम आहे.भंगसाळ नदी कुडाळ शहराच्या बाजूने वाहत आहे. कुडाळ शहर भौगोलिकदृष्ट्या सखल व मैदानी प्रकारचे असल्याने पावसाळ्यात नदीला पूर आल्यास त्याचे पाणी कुडाळ शहराच्या आजूबाजूच्या परिसरात पावशी, पिंगुळी व अन्य ठिकाणी पसरते. भंगसाळ नदीला पूर आल्यास महामार्गावरील वाहतूकही काही काळ बंदावस्थेत असते. याचा फटका कुडाळवासीयांनाच जास्त बसतो. कुडाळ तालुक्यात सुमार पाऊस असला आणि सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरिही भंगसाळ नदीला पूर येतो. त्यामुळे पूर केव्हा येईल, याबाबत शक्यता वर्तविता येत नाही. पुराचे पाणी शहरातील आंबेडकर नगर, भैरववाडी, मस्जिद मोहल्ला, लक्ष्मीवाडी, केळबाईवाडी तसेच अन्य ठिकाणी घुसते. यामध्ये आंबेडकर नगर वसलेल्या ठिकाणी शेतजमिनी असल्याने या नगराला जास्त धोका संभवतो.दरवर्षी पुराचे पाणी येत असे त्याठिकाणी शेतजमिनीच होत्या. त्यामुळे घरादारात पाणी घुसण्याचे प्रकार कमी होते. मात्र, सद्यस्थितीत ज्या शेतजमिनींमध्ये पुराचे पाणी पसरत असे त्याठिकाणीच नॉट अ‍ॅप्लिकेबल क्षेत्र मानून प्लॉटिंग करण्यात आले आहे. त्याठिकाणी मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. या जमिनीवर इमारती उभारणीसाठी यावर्षी मातीचा भराव टाकण्यात आला आहे.पुराच्या पाण्यामुळे शहरातील काही भागातील घरांना तडे गेले आहेत. तसेच पाणी घरात घुसून जमीन खचणे व सामानाचीही नुकसानी झाली आहे. यानंतरही शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नसून रहिवाशांनी घरांची तात्पुरती डागडुजी केली आहे. यावर्षी मातीचा भराव टाकण्यात आल्याने पुराच्या पाण्यात मोठी वाढ होणार असल्याचे दिसत आहे. शासनाने अशा पूरग्रस्त भागातील नागरिकांकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण, भर पावसात संसार उघड्यावर टाकून कोणीही स्थलांतर करत नाही. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.शासनाचा अजब कारभारपूरस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना शासन स्थलांतरीत होण्याचे सल्ले देते. परंतु, या नागरिकांची कोणतीही सोय शासन करत नाही. पूर्वापारपासून या भागात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतर करण्यास सांगणारे शासन नदीपात्रालगतच्या भागांमध्ये इमारती बांधण्याची परवानगी का नाकारत नाही? पुराचे पाणी पसरणाऱ्या ठिकाणी इमारती बांधण्यास परवानगी शासनच देते आणि ते पाणी अन्यत्र घुसल्यास त्याची जबाबदारीही टाळते, असा शासनाचा गोंधळात टाकणारा कारभार सुरु आहे.-पुराचे पाणी पसरणाऱ्या क्षेत्रात नव्याने बांधकामे करण्यात येणार आहेत.-जमीन मालकांनी या ठिकाणी उंच भाग करण्यासाठी मातीचा भराव टाकला आहे.-यामुळे या परिसरात पाणी येण्याचे प्रमाण कमी होणार आहे.-मात्र, पूरस्थितीमध्ये याठिकाणी जे पाणी पसरत असे त्या पाण्याचा प्रवाह बदलणार असून पुराचे पाणी अन्यत्र नागरिकांच्या वस्तीत घुसणाच्या संभव आहे.-नदीपात्राजवळ वाढत जाणाऱ्या बांधकामांमुळे आंबेडकर नगराला धोका निर्माण झाला आहे.४पुराच्या पाण्यामुळे यावर्षी मुसळधार पावसात येथील काही घरांना पाण्याने वेढा दिला होता. ४काही घरातील माणसांनी सामानाची बांधाबांध करत स्थलांतराची तयारी ठेवली होती. -मात्र, काहीवेळाने पाऊस थांबल्याने पाणी ओसरले.-येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. परंतु, पावसाळ्यात पुन्हा पुराची स्थिती निर्माण झाल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती कायम आहे. -या वस्तीतील नागरिकांनी पूर आल्यास काय करावे, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.